प्रत्येक भारतीय नागरिक हा हिंदूच – मोहन भागवत

मुंबई : ७ सप्टेंबर – ‘हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हा ‘हिंदू’ आहे’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. ते ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी’ या कार्यक्रमात बोलत होते.
समंजस’ मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. भारतातील अल्पसंख्याक समुदायाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. कारण हिंदू कोणाशीही वैर करत नाहीत’, असेही मोहम भागवत म्हणाले.
हिंदू हा शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरीचा आहे. हा इतर विचारांचा अनादर नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्वाबद्दल नाही तर भारतीय वर्चस्वाबद्दल विचार करावा लागेल. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे”, असेही मोहन भागवत म्हणाले.
इस्लाम आक्रमकांसह भारतात आला. हा इतिहास आहे आणि त्याच प्रकारे सांगितला पाहिजे. सुज्ञ मुस्लिम नेत्यांनी अनावश्यक मुद्द्यांना विरोध केला पाहिजे. अतिरेकी आणि अतिरेक्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. जितक्या लवकर आपण हे करू, तितके समाजाचे कमी नुकसान होईल”, असे आवाहन भागवत यांनी केले.
“महासत्ता म्हणून भारत कोणालाही धमकावणार नाही. हिंदू हा शब्द आपल्या मातृभूमी, पूर्वज आणि संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा समानार्थी आहे. या संदर्भात प्रत्येक भारतीय आपल्यासाठी हिंदू आहे. मग तो त्याच्या धार्मिक, भाषिक आणि वांशिक असो. हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. भारतीय संस्कृती विविध विचारांना सामावून घेते आणि इतर धर्मांचा आदर करते”, असे मोहन भागवत ‘राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी’ या परिसंवादात म्हणाले.
या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरचे कुलपती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनीही उपस्थिती लावली. खान म्हणाले, की ‘अधिक विविधता समृद्ध समाजाकडे जाते. भारतीय संस्कृती प्रत्येकाला समानतेने वागवते’.
तर, हसनैन म्हणाले, की ‘मुस्लिम विचारवंतांनी भारतीय मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे’.

Leave a Reply