गडचिरोली : ७ सप्टेंबर – गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी परिसरातील १५ गावामध्ये वाघाची दहशत कमी होत नसून या परिसरातील नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने दोन लावण्यात आले. तरीही सोमवार ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्ती वाघाने हल्ला करून ठार केले. नामदेव गेचू गुड्डी (५५) रा. धुंडेशिवणी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे सदर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षात वाघाने १३ नागरिकांचा बळी घेतला आहे.
आंबेशिवणी परिसरातील १५ गावात वाघाची दहशत निर्माण झाल्याने नागरीक भयभीत झाले आहे. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी १५ गावातील नागरिकांनी १ सप्टेंबरपासून चार दिवस गडचिरोली येथील मुख्य वनरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यवनसंरक्षक कार्यालयाने नरभक्षक वाघाची ओळख करून त्याला पकडण्याची परवानागी देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता. वरिष्ठ अधिकार्यांनी सदर वाघाला पकडण्याची परवानगी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. वनविभागाने संबंधित जंगल परिसरात वाघाला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आहे आहेत. दरम्यान आज सोमवारी दुपारीच्या सुमारास नरभक्षक वाघाने जनावरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे आंबेशिवणी परिसरातील १५ गावातील नागरिकांमध्ये पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे.