५० हजारांच्या अफीमसह आरोपी अटकेत

चंद्रपूर : ७ सप्टेंबर – चंद्रपूर येथील पागलबाबानगर परिसरातील एका घरातून ५० हजार रुपये किंमतीचे गुंगीकारक पदार्थ ‘अफीम’ जप्त करण्यात आली. ही कारवाई रामनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. या प्रकरणी आरोपी देवेंद्रसिंग उर्फ लॉडी अवतारसिंग गिल (३६, रा. पागलबाबानगर, चंद्रपूर) यास अटक करण्यात आली आहे.
रामनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर गिते यांनी पथकासह पाललबाबानगर येथील देवेंद्रसिंग उर्फ लॉडी अवतारसिंग गिल यांच्या घरी धाड टाकली. घराची झडती घेतली असता घरातील लाकडी पलंगाच्या खोक्यात लपवून ठेवेलेली ५०० किलोग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची अफिम आढळून आली. हे अफीम जप्त करून आरोपिविरूध्द रामनगर पोलिस ठाण्यात कलम ८ (क), १ (ब) अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली.

Leave a Reply