संपादकीय संवाद – परधर्मीय मुलींना होतो आहे हिजाबचा आग्रह

दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरात घडलेली एक घटना सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय झाली आहे, तो दिवस आंतरराष्ट्रीय हिजाब दिवस होता असे समाजमाध्यमांवर जाहीर केले गेले होते, हिजाब हा उर्दू शब्द आहे, हिजाब म्हणजे मुस्लिम महिला वापरतात तो बुरखा. मुस्लिम महिलेवर परपुरुषाची नजर पडू नये म्हणून त्या महिलेला नखशिखांत झाकून ठेण्याची मुस्लिमांची प्रथा आहे. त्या महिलेला बुरखा घातला जातो, या बुरख्यातून फक्त दोन डोळे उघडे असतात, बाकी सर्वकाही झाकलेले असते. भारतीय संस्कृतीतही फार पूर्वी घुंघटची पद्धत होती, आता आधुनिक जगात ही पद्धत संपत चालली आहे. मात्र कर्मठ मुस्लिमांनी आजही ही पद्धत कायम ठेवली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली, तेव्हा सर्व महिलांना हिजाब वापरणे सक्तीचे करण्यात आले असून हिजाब न वापरल्यास शारीरिक दंडाची शिक्षाही दिली जाते, अश्या बातम्या आहेत.
त्या दिवशी सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल्स परिसरात असलेल्या मुख्यमंत्री निवासासमोरच्या व्हीआयपी रस्त्यावरून काही तरुण मुली मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या, त्यावेळी त्याठिकाणी काही मुस्लिम महिला पोहोचल्या आणि या रस्त्याने जाणाऱ्या तरुण मुलींना अडवून हिजाब वापरणे कसे योग्य आहे, म्हणून तुम्हीही हिजाब वापर असे पटवून देऊ लागल्या. हिजाब वापरण्याचा त्या महिलांचा आग्रहचं होता, त्यावेळी त्या महिलांसोबत सुरक्षित अंतरावर काही पुरुषही मोटारसायकल घेऊन उभे होते, काही काळ हा प्रकार तिथे चालू होता.
या रस्त्याने जाणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला त्यावेळी त्यांनी तिथे जाऊन चौकशी केली, सदर हिजाबचे समर्थन करणाऱ्या महिलांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर सदर नागरिकांनी पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली, त्यावेळी या हिजाबचा प्रचार करणाऱ्या महिला सोबतच्या मोटारसायकलस्वारांबरोबर तिथून पळून गेल्या. दरम्यान या प्रकरणाची सदर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली, पोलिसांनी तक्रार नोंदवून चौकशी सुरु असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना कळवलेले आहे.
भारत हा सर्वधर्मांचा आदर करणारा देश म्हणून ओळखला जातो, इथे सर्वानाच धार्मिक स्वातंत्र्य दिले गेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा आहे. अश्यावेळी आमच्या धर्माप्रमाणेच तुम्ही वागा असे आग्रह धरणे कितपत योग्य आहे? भारतात असलेल्या धर्मांमध्ये हिंदुधर्म हा सहिष्णू विचारांचा धर्म म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मातील लोक इतरांना आपल्या धर्मात आलेच पाहिजे आ आग्रह कधीच धरत नाही मात्र मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील धर्मप्रचारक हे अतिशय आक्रमकपणे आपल्या धर्माचा प्रचार करीत असतात. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे, अश्यावेळी अश्याप्रकारे आमच्या धर्मानुसार वर्तन करा, हा आग्रह धरणे कितपत योग्य आहे, याचा विचार व्हायला हवा. अश्या आक्रमक धर्मप्रचारकांवर वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी. आजपर्यंत आपल्या देशातील राज्यकर्ते अस्ल्पसंख्यकांचे लांगुलचालन करण्यात धन्यता मनात होते, मात्र आता परिस्थिती बदललेली आहे, आतातरी असे बळजबरीचे धर्मांतरण थांबायला हवे, इतकीच अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करता येईल.

अविनाश पाठक

Leave a Reply