प्रत्येकाने अवयवदान करून संवेदनशिलतेचा परिचय देण्याची गरज – नितीन गडकरी

नागपूर : ५ सप्टेंबर – अवयवदानाने अनेकांना जीवदान मिळत असल्याने प्रत्येकाने अवयवदान करून संवेदनशिलतेचा परिचय देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या पुढाकाराने आणि आयएमए, वनामती व रोटरी क्लब यांच्या सहकार्याने अवयव प्रत्यारोपण चळवळीत विविधांगी सहकार्य करणारे पत्रकार, पोलिस तसेच अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा आज गौरव करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच वनामतीच्या संचालिका डॉ. माधवी खोडे चवरे, क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. जेरिस्टिन वॉचमेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अवयव दान करणार्या व्यक्ती आणि कुटुंबीयांचे नितीन गडकरी यांनी याप्रसंगी अभिनंदन केले. ते म्हणाले की, अवयवदान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात. अवयवदानाबाबत अन्य देशांमध्ये जेवढी जनजागृती झाली तेवढी आपल्या देशात नाही. पण विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रासार‘या संस्थांमुळे व या क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींमुळे अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण होईल. यामुळे अनेकांचे प्राण वाचतील.
अवयवदानासारखे महत्त्वाचे कार्य करणार्या व्यक्तींना समाजासमोर आणण्याचे काम विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने केले. नागपुरातही आता हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे शेजारी प्रदेशांनाचाही त्याचा लाभ होईल व अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल.
ग्णालयांमध्ये गरिबांसाठ़ी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपले प्रयत्न आहेत. नागपूर हे मेडिकल हब बनावे यासाठ़ीही आपले प्रयत्न आहेत. आरोग्य सुविधांमधील उणिवा दूर झाल्या तर नक्कीच लोकांचे प्राण वाचणार आहेत. कोणतेही संकट आले तरी त्याचा सामना करण्याची आमची तयारी असावी, असे ते म्हणाले.
प्रारंभी केंद्राच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस व वीणा वाठोरे यांनी केले. डॉ. शिवनारायण आचार्य यांनी अवयवदानाविषयी प्रश्नमंजुषा घेतली. डॉ. विरेश गुप्ता, डॉ. नरेश तिरपुडे, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. पी.के. देशपांडे, डॉ. अश्विनीकुमार आचार्य, डॉ. समीर जहागिरदार उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, आता महामार्गांवर अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था आम्ही करणार आहोत.

Leave a Reply