औषध दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ७० लाखांचा माल जळून खाक

चंद्रपूर : ३ सप्टेंबर – महानगरातील भिवापूर प्रभागातील जैराम औषध दुकालाला भीषण आग लागली. या आगीत औषधीचे दुकान जळून खाक झाले असून, यात जवळपास ७० ते ८० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.
भिवापूर प्रभागातील हनुमान मंदिराजवळील जैराम औषधीचे दुकान नेहमीप्रमाणे सुरू होते. रात्री दुकान बंद करून औषध दुकानाचे संचालक अनिल लालसरे घरी गेले. दरम्यान, पहाटेच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. ही आग शॉर्टसक्रीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात यशस्वी ठरले नाही. अग्निशमन दल येईपर्यंत आगीत दुकान खाक झाले होते.

Leave a Reply