विहिरीत पडलेल्या १० रानडुकरांना सुखरूप बाहेर काढले

नागपूर : १९ एप्रिल – हिंगणा वनपरिक्षेत्रातील मांडवघोराड शिवारीतील विहिरीत सकाळी पडलेल्या दहा रानडुक्कराला वाचविण्यात सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या रेस्क्यू टीमला यश आले. ही सर्व रानडुक्करे अगदी यशस्वीरित्या या टीमने बाहेर काढली.
मौजा मोहगांव येथील उषा माणिकराव पाटील यांच्या शेतात असणाèया विहरीत सकाळी सहा वाजताच्या सुमारास १० रानडुक्करे पडल्याची माहिती गावकèयांनी वनरक्षक एस सपाटे यांना भ्रमणध्वनीद्वारी दिली. माहिती मिळताच वनरक्षकांनी घटनास्थळ गाठले. तेथील पििरस्थिती लक्षात घेता त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार वन बचाव दलाचे कर्मचारी काही वेळात घटनास्थही पोहचले. त्यानंतर या रानडुकरांना वाचविण्याची मोहिम सुरु झाली. विहिरीत पडलेल्या रानडुकरांना एक एक करुन बाहेर काढण्यात आले. यात एकाही रानडुकर जखमी झाले नाही हे विशेष. सदर मोहिमेत वनपाल नामदेव केंद्रे, वनरक्षक समीर सपाटे, योगेश नेहारे, अनिल घोडके, नितीन कराड, वाहनचालक प्रकाश सहारे, वनमजूर हरीचंद्र मुके आदींचा समावेश होता.

Leave a Reply