मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान – जयदीप कवाडे

नागपूर : २४ ऑगस्ट – नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे तो कदापि सहन केला जाणार नाही असे सांगतानाच कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याचपध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही असा स्पष्ट इशाराही जयदीप कवाडे यांनी दिला आहे.
नारायण राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही हे भाजपला कळले पाहिजे असा टोलाही जयदीप कवाडे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत,जर का येणाऱ्या २४ तासात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरका मा.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली नाही तर या महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात बॅन नारायण राणे हे आंदोलन करू असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी दिला आहे.

Leave a Reply