स्मृतीस्थळ शुद्धीकरण करण्याऐवजी मनं शुद्ध करा – नारायण राणे

मुंबई : २० ऑगस्ट – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यापूर्वी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार प्रहार केल्याचं पहायला मिळालं. मी कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे आणि स्मृतीस्थळ शुद्धीकरण करण्याऐवजी मनं शुद्ध करा असा खोचक सल्लाही यावेळी राणेंनी शिवसेनेला दिला.
मी पॅन्ट वर करुन दलदलीतून बाळासाहेबांच्या स्मारकापर्यंत पोहोचलो. बाळासाहेबांबाबत इतका आदर असेल तर ते स्मारक जागतिक दर्जाचे करावे. मी फक्त गोमुत्रासाठी आलो आहे का? ज्याला गोमूत्र शिपंडायचे त्यांनी शिंपडावे. मला कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. स्मृतीस्थळ शुद्धीकरण करण्याऐवजी मनं शुद्ध करा असा सल्लाही यावेळी राणेंनी शिवसेनेला दिला. औषधात पैसे खाणाऱ्या या लोकांना हिंदू धर्मात पवित्र असलेले गोमूत्र हातात धरायची पण लायकी नाहीए अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. राणेंनी पुढे म्हटलं, बाळासाहेंबाच्या स्मारकालावर जाऊन नतमस्तक झालो. मी साहेबांना म्हणालो आज तुम्ही आशिर्वाद द्यायला हवा होतात.
३२ वर्षांचा मुंबईतील बकालपणा घालवायचा असेल तर सत्तांतर होणं गरजेचं आहे. मुंबईत मनपात भाजपची सत्ता आल्यास शहराचं रुपडं बदलून टाकू अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी नारायण राणेंनी दिली आहे.
सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरुन नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नारायण राणेंनी म्हटलं, लाचारीचा एक भाग म्हणून आज बैठक होत आहे. बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती, आत्ताची शिवसेना म्हणजे लाचारीची शिवसेना झाली आहे. बाळासाहेबांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा त्याग केला नाही.
ही यात्रा पंतप्रधानांच्या संकल्पनेतून आली आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा करत असून मागील 7 वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply