रोही आडवा गेल्याने झालेल्या अपघातात सहा महिन्याच्या बाळासह दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर

वर्धा : १८ ऑगस्ट – रोही आडवा गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याचे सहा महिन्याचे बाळ दगावल्याची घटना सरूळ वायगाव मार्गावर आज १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. दुचाकीस्वाराची पत्नी गंभीर जखमी असून उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव आलोडा निवासी निलेश म्हैसकार वय ३० हे सपत्नीक आपल्या सहा महिन्याच्या बाळासोबत सरूळमार्ग एम एच ३२/ एन -३२५६ या सायकलने वायगावकडे जात होते. वायगाव शिवारात गणेश पराते यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीला रोहीच्या कळपाने जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीला अपघात होऊन तिघेही गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी जख्मीनां उपचारासाठी इस्पितळात हलवितांना निलेश आणि त्याच्या सहा महिन्याच्या बाळाचे वाटेतच निधन झाले. तर निलेशची पत्नी तेजश्री म्हैसकार ही सेवाग्राम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

Leave a Reply