गडचिरोलीत दुर्मिळ जिवंत खवल्या मांजरासह एकाला अटक

गडचिरोली : १८ ऑगस्ट – वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ जिवंत खवल्या मांजरासह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सिरोंचा वन विभागातील अंतर्गत येत असलेल्या आसरअली वनपरिक्षेत्रातील चेतलपली येथे १७ ऑगस्ट रोजी धाड टाकून करण्यात आली आहे. तसेच जिवंत खवले मांजर ताब्यात घेण्यात आले असून दिवाकर लसमया गावडे (२२) याला अटक करण्यात आली आहे.
चेतलपल्ली येथील एका इसमाच्या घरी खवले मांजर असल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली होती. याची माहिती वनविभागाला मिळताच १७ ऑगस्ट रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या पथकाने त्या इसमाच्या घरी धाड टाकून खवले मांजर जप्त केले. सोबतच दिवाकर लसमया गावडे याला ताब्यात घेऊन सदर इसमावर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार व सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) सुहास बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील क्षेत्र सहाय्यक श्रीकांत नवघरे, भूपेश तागडे, सचिन शेडमाके, मोरेश्वर कोल्हे, राजू निब्रड, प्रीती पोटावी, सुनिता वेलादी आदींनी केली आहे.

Leave a Reply