दुचाकीवर जंगली डुक्कर घेऊन जाणाऱ्या युवकांचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

अमरावती : १० ऑगस्ट – अमरावती जिल्ह्यातील परतवाडा वझ्झर आर.टी.ओ नाक्याजवळ एका दुचाकीवर जंगली डुक्कर घेऊन जाने दोघांच्याही जिवावर बेतले आहे. दुचाकीवरून दोन युवक एका जंगली डुकराला घेऊन जात असतांना पकडून बांधलेल्या डुक्कराने सुटण्यासाठी झटका देताच दुचाकीचे नियंत्रण सुटले आणी थेट दुचाकी विरुद्ध दिशेने येणार्या ट्रॅक्टरला धडकले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनावरील डुक्कराचे मुंडके धडापासून वेगळे पडले इतकेच नाही तर दुचाकीवर असणार्या एकाच घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरी दहीकर अपघातामधे मृत व सुनील बोधा कास्देकर वय २५, चिखलजोडी बैतूल असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.
अपघातातील जखमी व मृत्युमुखी पडलेले दोघेही जण त्यांच्या दुचाकी क्रमांक एम पी ४८ एम व्ही. ९५५६ ने गाडीवर पोत्यामध्ये जिवंत डुक्कर घेऊन जात होते. अपघातातील जखमी असणाऱ्याला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. तर हरी दहीकर याचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहे.

Leave a Reply