धावत्या ट्रेनसमोर उडी घेत युवकाने केली आत्महत्या

गोंदिया : ८ ऑगस्ट – धावत्या ट्रेनसमोर उडी घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना गोंदियात उघडकीस आली आहे. जेवणानंतर खर्रा खाण्याच्या निमित्ताने तो बाहेर पडला होता. हितेश वालदे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या नवेगांव बांध येथे गोंदिया-बल्लरशहा रेल्वेमार्गावर ही घटना घडवी. ३४ वर्षीय हितेश वालदे याने धावत्या मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. हितेशच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हितेश रात्रीचं जेवण करुन खर्रा घेण्यासाठी जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. मालगाडीच्या समोर येऊन त्याने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेचे माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी जमा झाली होती. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसासह नवेगांव बांध पोलिसांनी दिली. हितेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Leave a Reply