दोन लसींचा मिश्रणाचा डोस सुरक्षित आणि अधिक प्रभावशाली – आयसीएमआरचे संशोधन

नवी दिल्ली : ८ ऑगस्ट – एखाद्या व्यक्तीने आधी कोवॅक्सिनच्या लसीचा डोस घेतला असेल आणि त्यानंतर त्याला कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला गेला तर त्याचा काय परिणाम होईल? दोन्ही वेगवेगळ्या लींचे डोस देणं सुरक्षित आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आयसीएमआरने एक संशोधन केलं आहे. दोन लसींच मिश्रणाचा डोस सुरक्षित आहे. तसंच यामुळे अधिक चांगली प्रतिकारशक्ती तयार होते, असं या संशोधनातून आयसीएमआरने म्हटलं आहे.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे डोस दिल्याने करोना संसर्गाविरोधात अधिक चांगली सुरक्षा मिळते. लसींचे मिक्सिंग ( दोन वेगळ्या लसींचा एक-एक डोस) आणि मॅचिंगबाबत आयसीएमआरने संशोधन केले. या संशोधनाचे निष्कर्ष अतिशय सकारात्मक आले आहेत. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांच्या पॅनेलने कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचे मिक्स डोसवर संशोधन करण्याची शिफारस केली होती.
एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देता येऊ शकतात का? याचा अभ्यास केला गेला. लसीकरणाचा कोर्स पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे वेगवेगळे डोस दिले जाऊ शकतात का? याकरता चौथ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचणीसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली होती. या चाचणीसाठी ३०० आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.

Leave a Reply