पोटच्या मुलानेच केली वडिलांची दगडाने ठेचून हत्या

अमरावती : ७ ऑगस्ट – अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटपूर या गावात पोटच्या मुलाने आपल्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मुलाने मृताची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचला होता. दरम्यान, शिरखेड पोलिसांनी आरोपी मुलाला चार तासातच अटक करून हत्येचा छडा लावला आहे. रमेश माणिकराव अकोटकर असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे.
रमेश हे मागील काही दिवसांपासून वृद्ध आईवर वाईट नजरेने पाहत होते. त्यामुळे आपल्या वडिलांचे हे कृत्य पाहून आरोपी मुलगा संदीप अकोटकर व मृत वडील रमेश आकोटकर या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यातच आरोपी संदीप याला संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी संदीप आकोटकर हा घटनास्थळावरून फरार झाला होता. मध्यरात्री पोलिसांनी शोध मोहीम राबवून अवघ्या चार तासात त्याला अटक केली.

Leave a Reply