१७ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

यवतमाळ : ७ ऑगस्ट – शाळेतून घरी परत येत असलेल्या १७ वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे,
शाळेतून घरी परतत असलेल्या विद्यार्थीनीला जबरदस्ती चारचाकी वाहनातून नेऊन अत्याचार करण्यात आला. २८ जुलै रोजी आर्णी तालुक्यातील जवळा येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी पीडित तरूणीने ५ ऑगस्ट रोजी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आकाश प्रकाश डोमकावळे (२५) रा.सायरबाई ले आऊट,आर्णी व धीरज विलास व्यवहारे (२४) रा. सेवादास नगर,आर्णी अशी या दोन आरोपींची नावे आहेत. पीडित विद्यार्थीनी २८ जुलै रोजी शाळेतून घरी जात असताना आरोपींनीतीला जवळा येथील प्रवासी निवाऱ्यातून चारचाकी वाहनामध्ये जबरदस्तीने डांबून तीच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. तसेच याविषयी कुठे वाच्यता केल्या जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये तसचे बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यअंतर्गत गुन्हे दखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply