सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

तोंड दाबून बुक्क्यांचा मार – सुप्रीम कोर्टाचा वार – आता मात्र माघार

पेगॅसस….पेगॅसस…..पेगॅसस कॉंग्रेस ने उठवलेलं रान आणि इतर पक्षांनी उचललेली पेगॅसस ची कमान. संसद बंद पाडेस्तोवर पेगॅसस नावाचा धुमाकूळ घातला गेला. समानांतर संसद, संसदेबाहेर चालविण्याचा प्रयत्न केला गेला. दरवेळी प्रमाणे मोदी सरकारवर अचुक निशाणा पेगॅसस च्या नावाने साधल्या गेला आणि सुप्रीम कोर्टात शर्मा यांच्या नावाने याचिका दाखल करून, पेगॅसस नावाचे आडंबर देशभ-यात फैलावण्यात कॉंग्रेस सफल झाली.
काळ बदलला तशा पद्धती बदलल्या. सगळ्या बाबतीत हे घडले. अगदी युद्धनीती सुद्धा बदलली. शस्त्रास्त्रांवर पैसा कमावणारी अभेद्य अमेरिका – कोरोना नावाच्या रोगाने ग्रस्त केली. अमेरिकेने शस्त्र, सेना ह्यांच्या बलावर जगभरात गाजवलेली मर्दुमकी वर्षभरात बेचिराख झाली. पण प्राप्त परिस्थितीला “संधी” मध्ये कसे बदलायचे हे भारताच्या पंतप्रधानांनी दाखवून दिले. मात्र हिंदू संस्कृती चा परिचय जगाला करून द्यायला ते विसरले नाहीत,”वसुधैव कुटुंबकम्”! मी जरी शोधकर्ता तरी आणिबाणी च्या परिस्थिती मध्ये स्वतः चा फायदा न बघता, किमान शुल्कात ही लस जगाला उपलब्ध करून देत – “भारत जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे” – हे परिस्थिती ओळखून जगाकडून येणारी प्रतिक्रिया, जगाकडून येणारी ही शाबासकी म्हणजे भारतीय पंतप्रधान. “जयाअंगी मोठे पण तया यातना कठीण” ह्या उक्तीप्रमाणे मोदीविरोध हा ओघाओघाने राजकारणात येणारच. बरे ! बाहेरच्या शत्रुवर मात करणे सोपे असते.
मात्र भारतात तर ७० वर्षे शत्रुच कॉंग्रेस च्या रुपात भारतावर म्हणजे हिंदू बहुल क्षेत्रावर, छुप्या चाली खेळंत, हिंदू लोकांची दिशाभूल करीत, हिंदू लोकांचा वापर – हिंदुत्व तत्वांच्या विरोधात करीत, हिंदू जनसंख्या हळूहळू कमी करीत, सेक्युलर भारताची संकल्पना हिंदुंच्या डोस्क्यात घुसवीत – भारताला हळूहळू गजवा एक हिंद करण्याच्या दिशेने भारतावर राज्य करीत अग्रसर होता….सगळे व्यवस्थित चाललें होतं की मार्गात मोदी आला आणि “धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे” चा प्रत्यय देत, हिंदू तील हिंदुत्व खडबडून जागे केले. आणि मग कॉंग्रेस चे धाबे दणाणले. मोदी हटाव मोहिमेला कॉंग्रेस ने प्रारंभ केला. अमेरिका अध्यक्ष ओबामा म्हणतात की मोदी हे निष्कलंक, भ्रष्टाचार रहित – चारित्र्य वान जीवनाचे धनी आहेत. असा भारतीय पंतप्रधान लाभल्याने, आम्हाला आमच्या पद्धतीने भारताशी सौदेबाजी करणे दुष्कर झाले आहे.
कॉंग्रेस आणि मोदी – दोन टोकाचे, दोन पंथ – एक चारित्र्यसंपन्न – कॉंग्रेस भ्रष्टाचार, हिंदू विरोधी, राष्ट्र विरोधी, पाकिस्तान धार्जिणा, चीन धार्जिणा आणि देशासाठी विघातक सौदेबाज, आतंकवाद्यांना पनाह देणारा हिंदू भारताचा घोर विरोधक, सेक्युलर च्या नावाखाली मुस्लिम धार्जिणा.
तर असल्या कॉंग्रेस आणि तत्सम पक्षांना वठणीवर आणण्यासाठी काय उपाय? तर घरात किंवा दुश्मनाच्या पडावात काय चाललंय हे जर बित्तंबातमी पाहिजे असेल तर कडक उपाययोजना म्हणजे ,”बहिर्जी नाईक” उपाय योजना.
आठवला बहिर्जी नाईक – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख !!!! स्वतः च्या जीवावर खेळंत हिंदवी स्वराज्याला स्थापन करण्यात जे समर्पण बहिर्जी नाईकांचे होते ते गुप्तहेर खाते. असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात बहिर्जी नाईक हे काल्पनिक पात्र होते. मात्र बहिर्जी नाईक दरबारात कोणत्या वेषात हजर आहे हे फक्त छत्रपती आणि बहिर्जी नाईक ह्या दोघांना च् माहिती असे. फकिर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे किती किती रुपे तुझी सांगावी. पण ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची विजय पताका उत्तुंग करायला सहाय्यभूत होती.
असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या तुरुंगात असताना. दरबारात आणि संपूर्ण आग्र्यात ४०० गुप्तहेर पसरले होते. त्यांची भाषा ही सांकेतिक होती. बहिर्जी नाईक नसते तर छत्रपतींची आग्र्याहुन सुटका अशक्य होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक महत्वाच्या घटनेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. आणि महाराजांच्या यशस्वीतेची गाथा नाईका व्यतिरिक्त अपुरी. आणि माहिती आहे – चुकीच्या माहितीचे गुप्तहेराला प्रायश्चित्त काय होते? “मृत्युदंड” एकदा स्थापित झाले की जाणून बुजून चुकीची माहिती देवून, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्या गेला. तर त्या गुप्तचराचा मुडदा पाडण्यात येई. अशा चुकी करणा-या गुप्तहेराला, कोणी मारला – कसा मारला हे फक्त बहिर्जी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे ह्यांना माहिती असे. खाते सुरक्षित ठेवायचे तर बाटलेले बाटगे गुप्तचर खात्यात नकोच. आणखी काही राज्यातील माहिती बाहेर जाण्याअगोदर, जगातून अशा गुप्तचरांनी गच्छंती केली जात असे.
अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे, पुरंदर चा वेढा, सुरतेची लूट. अफझलखानाचे भेटीचे वेळी खानाचा डाव छत्रपतींना जीवे मारण्याचा आहे. त्याप्रमाणे महाराजांनी आपली भेटीची रचना बदलली. त्यांनी चिलखत घातले. खानाचा सगळ्यात घातक अंगरक्षक “सैय्यद बंडा” त्याला प्रति उत्तर म्हणून योजना आखली गेली. अफजलखानाने त्यादिवशी चिलखत घालु नये ह्यासाठी नाईकाने त्याच्याच् घरात खानाला आपल्या हेरांमार्फत चिलखत न घालता महाराजांच्या भेटीस येण्यास बाध्य केले. एवढी गुप्तचरांची पुर्वतयारी झाल्यानंतर – खान – महाराज भेट झाली. आणि बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने अफजलखान अल्लाला प्यारा झाला.
गुप्तहेर खाते आपल्या धन्याशी, देशाशी आणि आपल्या पेशाशी एक निष्ठ हवेत.
आणि आज आमच्या देशाचा बहिर्जी नाईक म्हणजे “अजित डोवाल” ३२ वर्ष कारकिर्दीची गुप्तचर यंत्रणेची आणि पाकिस्तान मधील धर्म बदलून ७ वर्षे, रिक्षावाला बनून सुवर्ण मंदिरातील खलिस्तानी अतिरेक्यांची इत्यंभूत माहिती आणि त्या जोरावर जिंकलेले “आॅपरेशन ब्लू स्टार” असे कितीतरी उदाहरणे श्री अजित डोवाल यांची देता येतील. कंधार प्लेन हाईजॅक, म्यान्मार सर्जिकल स्ट्राईक, पाक अधिकृत काश्मीर मधील आतंकवाद्यांचे कॅंप नष्ट करणे, उरी सर्जिकल स्ट्राईक मधील सहभाग येन केन सर्व प्रकारेण भारताची सुरक्षा मजबुत करण्यासाठी सदैव तत्पर राष्ट्राभिमानी, राष्ट्रप्रेमी, असा एकमेव “किर्ती चक्र” धारी अजित डोवाल. बहिर्जी नाईकांची तुलना फक्त सद्य अजित डोवाल ह्यांचेशी करता येवू शकते. दोघे ही प्रतिकुल परिस्थितीत शत्रुला मात देत, देशासाठी झटंत राहिले. दोघेही सद्य पेगॅसस चे मानकरी – जर पेगॅसस वापरल्या गेले असेल तर ही तुलना होवु शकते.
जितका भरवसा बहिर्जी नाईकांचा, अजित भोवतालचा तद्वतच भरोसेलायक अजुन एक संस्था आहे जी गुप्तचर, गुप्तहेर खात्यात नावाजलेली आहे आणि १००% भरोशाची खात्री म्हणुन जिच्यावर भारत भरोसा करु शकतो आणि जगाने देशभक्ती शिकावी ती मोसाद कडून. मोसाद च्या नावाने जग चळाचळा कापते. त्याच् इस्त्रायल देशाचे NSO कंपनीचे पेगॅसस – जे सारे विपक्ष एकत्र येत बोंबाबोंब ठोकत आहे – पेगॅसस हमारे फोन मे है – इज्जत हमारी फोन मे है असे आमचे नेते डरे डरे – बेहाल फटे फटे .
समजा केंद्र सरकारने ह्यांच्या फोन मागे पेगॅसस चे फटाके टाकले जरी असतील, राहुल गांधी म्हणतात तसे त्यांचा फोन पेगॅसस द्वारा हॅक करून कोणी बोलले जरी असेल तर…..तर…….तर….. राहुल गांधी चे धागे का उसवतात? आता पर्यंत राहुल गांधी आणि ३०० फोन असाच पेगॅसस चा पसारा जगासमोर मांडण्यात आला आहे.
जर सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की एक ही FIR किंवा पुरावा सादर न करता…..सिब्बल भाऊ आपले वकिलीची सब्बल घेऊन सरळ कोर्टात!!!!!!! संसद बंद पाडायला काळ्या कोटाची कोर्टात केवढी विडंबना!!!!
कॉंग्रेस तर राष्ट्रद्रोही आहे ह्यात शंका नाही.सुप्रीम कोर्ट सूद्धा तेवढेच दोषी आहे. केस फाईल करण्याबद्दल.
राहुल गांधी ह्यांनी आता आपला फोन मोबाईल सरकारला द्यायला हवा आपला शब्द खरा करायला. जसे डॉ संबित पात्रा म्हणतात की राहुल गांधीना भिती वाटते की फोन पेगॅसस साठी दिल्यास त्यांच्या राष्ट्रद्रोही कारवायांचा भांडाफोड होईल. म्हणून ते फोन देवू शकत नाही. तर राहुल गांधींना ही एक चांगली संधी आहे, आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची.
माझा खरा रोष सुप्रीम कोर्टावर आहे. २७ जुलैला याचिका दाखल केली आहे. संसद ह्या विषयामुळे बंद आहे, समानांतर संसद बाहेर चालवुन देशाच्या पायंड्याला धुळीत मिळविण्याचे काम चालू आहे मात्र सुप्रीम कोर्ट आज ५ आॅगस्टला तारीख देवुन सांगते की विना पुरावा, एफआयआर तुम्ही कशी काय तक्रार दाखल करता? हे काम तक्रार दाखल केल्याबरोबर, दुस-या दिवशी च् करता आले असते आणि परत १० आॅगस्टला पुढली तारीख देता?
एक आठवडा सुप्रीम कोर्टाने घेतला. आता १० आॅगस्ट ची तारीख दिली आहे. तर ह्या पंधरा दिवसांनंतर सुप्रीम कोर्ट – संसदेची १५ दिवस अधिकारीक रित्या दिवस वाढवून देणार का? जनतेच्या पैशाचा १५ दिवसाचा चुराडा झाला, त्याची रक्कम याचिका कर्त्याकडुन वसूल करणार का? की परत “माफीनामा” मागुन याचिका कर्त्यावर अनुग्रहाचा हात ठेवीत, देशाच्या प्रगतीत सुप्रीम कोर्टाची बाधा, भविष्यासाठी कायम ठेवणार???? आणि आम्ही मात्र आमचे सुप्रीम कोर्ट केव्हा बालिग होवून “न्यायोचित” निर्णय करणार हे १० तारखेला कळेल.
आजच्या घटकेपावेतो पेगॅसस – बहिर्जी नाईकांच्या भुमिकेत आहे. याचिकाकर्त्याकडे पेगॅसस चा पुरावा नाही. सुप्रीम कोर्टात केस म्हणजे फक्त ढगात गोळ्या मारणे आणि असेल तर फक्त सरकारला पेगॅसस चे खरे रूप माहिती – बहिर्जी नाईक – छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित आहे पण त्याचे अस्तित्वाचे पुरावे सादर करु शकत नाही.
तुर्तास कोण कशा खेळी खेळतोय बघायचे. आणि १० आॅगस्टला काय निर्णय येतो बघायचे.
सध्या तरी कॉंग्रेस “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” सहन करतेय असेच् म्हणावे लागेल.

भाई देवघरे

Leave a Reply