गडचिरोलीत आणखी एका हत्तीचा मृत्यू

गडचिरोली : ६ ऑगस्ट – महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथे आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच ३ आगस्ट रोजी ‘सई’ या हत्तीचा मृत्यू झाला होता. मृत्यूचं नेमक कारण काय हे अजूनही कळले नाही. शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आज अचानक मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव ‘अर्जुन’ असून मंगला या हत्तीणीने १५ जानेवारी २०१९ ला मकर संक्रांतीचा शुभ पर्वावर जन्म दिला होता. त्याचे नामकरण करून ‘अर्जुन’असे नाव ठेवण्यात आले होते. केवळ तीस महिन्याचा अर्जुन या नावाच्या हत्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजूनही कळू शकले नाही. मात्र,अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शासकीय हत्ती कॅम्प मध्ये नेमकं चाललंय तरी काय ? असा सवाल वन्यप्रेमी कडून करण्यात येत आहे.
आता नुकतेच ३ ऑगस्ट रोजी ‘सई’ नावाच्या ३२ महिन्याचा हत्तीचा मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन अहवाल अजूनही प्राप्त झाले नसतानाच आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याने आता सिरोंचा वनविभागाचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता तरी सिरोंचा वन विभागाला जाग येईल का ? आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply