प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणाऱ्या घटना – पंतप्रधान मोदी

टोकियो : २ ऑगस्ट- पंतप्रधान मोदींनी देशात घडणाऱ्या घडामोडींबद्दल दोन ट्विट केले आहेत. ऑगस्ट महिन्याची सुरुवात दमदार झाल्याचं अधोरेखित करणारे दोन ट्विट मोदींनी केलेत. भारत ऑगस्ट महिन्यात प्रवेश करत असून, अमृत महोत्सवाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणाऱ्या घटना घडत आहेत. विक्रमी लसीकरणाबरोबरच सर्वाधिक जीएसटी संकलनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे संकेत दिसत आहेत, असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. केवळ पी. व्ही. सिंधूनेच पदक जिंकलंय, असं नाही तर भारतीय आणि महिला हॉकी संघानेही दमदार कामगिरी केली. मला आशा आहे की १३० कोटी भारतीय आपलं काम कष्टाने, मन लावून करतील आणि भारत हा अमृत महोत्सव साजरा करताना यशाच्या नव्या शिखरांवर पोहचेल, असं मोदींनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत असून, रविवारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्यफेरीत धडक मारली. तीन वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताने अनपेक्षित धक्का देत ही कामगिरी केली.

Leave a Reply