उपचारासाठी गावातील भूमकाकडे गेलेल्या कोरोना बाधित महिलेचा मृत्यू


अमरावती : १७ एप्रिल -. कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी गावातील भूमकाकडे गेली दरम्यान गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला मेळघाटातील सेमाडोह गावात ही घटना घडली. कोरोना असल्याने प्रशासनाने रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र नातेवाईकांनी नकार दिला. अखेर शुक्रवारी दुपारी 2 वाजता महिलेवर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केला. होता
सेमाडोह येथील एक ४५ वर्षीय विधवा महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्रए सेमाडोह येथे रॅपिड अ‌टिजेन तपासणी करण्यात आली ती बाधित असल्याचा अहवाल १२ एप्रिल रोजी आला सदर महिलेला गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता
कोरोनाबाधित आल्याने त्या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे घेण्यास सांगितले होते. मात्र आपल्याला काहीच आजार झाला नसून कोरोना नावाचा रोग नाही. असे तिने आरोग्य यंत्रणेला सुनावले त्यानंतर त्या महिलेन उपचारासाठी सेमाडोह पासून दहा किमी अंतरावरील भवई गाव गाठले तेथे नातेवाईकांकडे जाऊन भूमकाकडे उपचार सुरू केला या दरम्यान आजार वाढल्याने शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.
सदर महिलेचा मृतदेह शुक्रवारी रात्री आठ वाजता सेमाडोह येथील घरी आणण्यात आला ही बाब गावकऱ्यांना समजतात त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर महेश कुरतके जीप सदस्या सुनंदा काकडे सरपंच अनिता चिमोटे, ग्रामसेवक सुरेंद्र चिकटे यांना कळवले. अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होते. मात्र नातेवाईक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे हा मृतदेह रात्रभर घरीच ठेवण्यात आला.अखेर शुक्रवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला.,

Leave a Reply