१५ ऑगस्टला दिल्लीच्या आकाशात अँटी ड्रोन रडार प्रणाली

नवी दिल्ली : ११ ऑगस्ट – भारताच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला म्हणजेच येत्या १५ ऑगस्ट रोजी आता आकाशातूनही संरक्षण मिळणार आहे. लाल किल्ला परिसरात अँटी ड्रोन रडार प्रणाली बसवली जाणार आहे. या प्रणालीचं वैशिष्ट्य म्हणजे लाल किल्ला परिसरातील 4 किमी अंतरापर्यंत जर कुठलाही संशयास्पद ड्रोन दिसला तर त्याला तिथेच नष्ट केलं जाणार आहे. तसेच नॅनो म्हणजे छोट्या ड्रोनलाही ही प्रणाली सहज शोधू शकते. अगदी दोन किमी परिसरात आलेल्या नॅनो ड्रोनलाही पाडण्याची किमया या तंत्रज्ञानात आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी एका महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रणालीच्या वापराचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत त्यांनी पोलीस दलाला विशेष सूचना दिल्या. सामान्य जनतेमधील हालचालींवरही नजर ठेवा, दिल्लीच्या सीमांवर तपासणी आणखी कडक करा, तपासणीवेळी कुणालाही सूट देऊ नका, अशा सूचना अस्थाना यांनी केल्या आहेत.

Leave a Reply