अकोला मनपा आयुक्तपदी गोविंद बोडके

अकोला : ३१ जुलै – महानगरपालिका प्रभारी आयुक्त अरोरा यांच्या जागेवर गोविंद मारुती बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची मनपा आयुक्तपदी तर आयुक्त अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पापळकर यांनी आयुक्तपदाचा प्रभार स्वीकारला नाही. परिणामी अरोरा यांच्याकडेच आयुक्ताचा प्रभार कायम होता. महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर गोविंद बोडके कार्यरत होते.
जितेंद्र पापळकर यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. बोडके हे महावितरणच्या कोकण परिक्षेत्र कल्याण येथे सह व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या बदली आदेशातही बदल करून त्यांना मनपा आयुक्तपदावर नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी कल्याण-डोंबवली महानगरपालिकेचे आयुक्तपद सांभळले आहे.

Leave a Reply