उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास पाणीटंचाई जाणवणार नाही – नितीन गडकरी

नागपूर : २८ जुलै – पाणी वाचवा, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर देशात पाणीटंचाई जाणवणार नाही. पाणी आणि पर्यावरण शुद्ध राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी एका आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी यांनी संवाद साधला. ज्ञानाचे आणि कचऱ्याचे संपत्तीत रुपांतर करणे ही आता देशाची गरज आहे. काहीच कचरा नसतो, त्याचा कुठे ना कुठे उपयोग होत असतो. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाची गरज आहे. गावातले पाणी गावात, शेतातले शेतात आणि घरातले पाणी घरातच राहिले तर पाण्याची पातळी वाढेल आणि पाणीटंचाईपासून सुटका होईल. कृषी क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर झाला तर पाणी वापरात बचत होईल. नवीन संशोधन, तंत्रज्ञानामुळे उत्पादनात कोणताही समझोता न करता खर्चात बचत करणे शक्य झाले आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी ही देशाची गरज आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी निर्माण केला. या सीएनजीवर नागपुरात महापालिकेच्या बसेस धावत असल्याचेही गडकरी म्हणाले.

Leave a Reply