घराच्या आवारातून निघाले तब्बल १६ विषारी नागाची पिल्ले

यवतमाळ : २८ जुलै – दिग्रस येथील हरिओम नगरातील अतुल मन्नरवार यांच्या घरातील आवारात सिमेंटच्या बेडखाली एक दोन नव्हे, तर तब्बल १६ विषारी अस्सल नागाची पिल्ले निघाल्याने चांगलीच खळबळ उडाली.
मन्नरवार परिवारच नव्हे तर संपूर्ण परिसराला भयभीत करणारी ही घटना घडली. मन्नरवार यांच्या घराच्या परिसरात साप निघालेत ही माहिती ‘इको फ्रेंडली ग्रुप’चे सर्पमित्र रवी गोरे, लखन रुडे व अनिल जाधव यांनी ही सर्व विषारी नागाची पिल्ले मोठ्या चातुर्याने पकडून एका बरणीत गोळा केली.
त्यात तीन पिल्ले मृतावस्थेत सापडलीत, तर १३ पिल्लांना जीवनदान देत येथील सिंगदच्या जंगल परिसरात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले आहे. १६ नागाची पिल्ले निघालेल्या हरिओम नगरातील मन्नरवार यांच्या घरी बघ्यांनी गर्दी केली होती. आपल्या घरातून नागाची सर्व पिल्ले गेल्याने मन्नरवार परिवाराने सुटकेचा श्वास घेतला.

Leave a Reply