२४ जुलैला पृथ्वीजवळून जाणार धोकादायक लघुग्रह – ताशी २८ हजार किमी वेग

न्यू यॉर्क: २१ जुलै- अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने एका मोठ्या मैदानाच्या आकाराएवढा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा दिला. हा लघुग्रह फार वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं नासाने म्हटलं आहे. या लघुग्रहाचं नाव २००८ जीओ २० असं आहे. २४ जुलै रोजी तो पृथ्वीजवळून जाणार आहे.
२००८ जीओ २० हा लघुग्रह प्रती सेकंद आठ किमी वेगाने प्रवास करत आहे. म्हणजेच एका तासाला हा लघुग्रह २८ हजार किमी वेगाने पृथ्वीजवळ येत आहे. या वेगाने एखादी वस्तू पृथ्वीवर आदळली किंवा तिने पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला तर हाहाकार उडेल. नियर अर्थ ऑब्जेक्ट प्रकारामध्ये मोडणारा म्हणजेच पृथ्वीजवळून जाणारा हा लघुग्रह २० मीटर रुंद आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून २८७ कोटी ८ लाख ४७ हजार ६०७ किलोमीटर अंतरावरुन जाणार आहे. हे अंतर पृथ्वी आणि चंद्राच्या अंतराच्या आठपट आहे. हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असला तरी हा लघुग्रह अपोलो प्रकारातील म्हणजेच सर्वात घातक लघुग्रहांपैकी एक आहे. नासा या लघुग्रहावर सतत लक्ष ठेऊन आहे.

Leave a Reply