भारत-श्रीलंका मालिकेला आजपासून सुरुवात

कोलंबो: १८ जुलै- श्रीलंकेविरुद्धच्या सहा मर्यादित षटकांच्या सामन्यांना आज रविवारी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने प्रारंभ होत आहे. आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघ उभे ठाकले आहेत. शिखर धवन भारतीय संघाचे तर दासुन शनाका श्रीलंका संघाचे नेतृत्व करत आहे. श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारत सरस असल्याचे दिसून येते. आतापर्यंत दोन्ही संघांत १५९एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांपैकी भारताने ९१ सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ५६ सामने जिंकले आहेत. या दरम्यान, दोन्ही देशांमधील एक सामना टाय झाला होता, तर ११ सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही..
शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया आज रविवारी श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर उतरणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. आर्द्रता देखील अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे खेळाडूंपुढे मोठे आव्हान असणार आहे.

Leave a Reply