धरणाच्या मधोमध असलेल्या झाडावर अडकून पडलेल्या माकडांना मिळाले जीवदान

अमरावती : १७ जुलै – अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील सामदा काशिपुर येथील धरणाच्या मधोमध असलेल्या झाडावर पाण्यामुळे माकडांचे झुंड अडकून पडले आहेत. याची माहिती मिळताच काल जिल्हा शोध व पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या झाडावर माकडे अडकली होती ते झाड चारही बाजूने पाण्याने वेढले होते. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी बोटीच्या साहाय्याने झाडाजवळ गेले. गेल्या तीन दिवसापासून माकड उपाशी असल्याने रेस्क्यू टीमने त्यांच्याकरता केळ, बिस्कीट, फळ नेले होते.
रेस्क्यू टीमने फळांचे आमिष दाखवून माकडांना आपल्या बोटीत घेतले आणि काठावर आणून सोडले. अजून जवळपास १० माकडं अडकून असून त्यांना वाचविण्यासाठी आज रेस्क्यू टीम अतोनात प्रयत्न करत आहे. आता पर्यत २८ माकडांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
शुक्रवारी झाडावर माकडाच्या धावपळीत पक्ष्यांचे घरटे खाली पडत होती. घरट्यातील पिल्लांना देखील रेस्क्यू टीमने जीवनदान दिले. यातील काही माकड बोटीत आलेच नाही आणि काही माकडानी पोहत पोहत काठ गाठला. त्यामुळे राहिलेले माकडांना रेस्क्यू करून त्यांना काठावर आणण्यासाठी जीव धोक्यात टाकून हे पथक प्रयत्न करत आहेत. यावेळी वन विभाग, महसूल विभाग आणि ग्रामस्थांनी ही खूप प्रयत्न केले.

Leave a Reply