संस्कृतचे प्रकांड पंडित डाॅ. स. मो. अयाचित यांचे निधन

नागपूर :१७ जुलै- संस्कृत विश्वातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेले प्रकांड पंडित आणि नागपुर विद्यापीठातील हस्तलिखित विभागातील माजी प्रमुख अधिकारी डाॅ. स. मो. अयाचित यांचे पुणे येथे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. डाॅ. अयाचित हे प्रो. रा. ना. दांडेकर यांचे शिष्य होते. नागपूर विद्यापीठातील हस्तलिखित विभागातील प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कार्य तर केलेच, परंतु हस्तलिखित विभागाला आकार देवून हा विभाग विकसितही केला. नागपुरातील “संस्कृत भवितव्यम्’ या संस्कृत साप्ताहिकाचे कार्यवाह आणि संपादक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. विदर्भ संशोधन मंडळाचे ते सदस्य होते. ग्रंथालय उभारणीतील हस्तलिखित विभागाकरिता डाॅ. अयाचित यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज विश्वविद्यालयाला स्वतंत्रा हस्तलिखित केंद्राचा दर्जा मिळाला. विदर्भातील अनेकानेक दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना त्याच्या सूचीकरणासह संशोधकांना खुला झाला आहे. याशिवाय नागपूर विद्यापीठातील हस्तलिखितांच्या सूचीचे तीन खंड प्रकाशित करण्याचे कार्यही त्यांच्या नावावर आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply