राजद नेते तेजस्वी यादव यांचे विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन, काँग्रेसला मैदानात उतरावं लागेल.

पाटणा:१० जुलै- राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. लोक प्रचंड त्रासातून जात असून, हे सरकार लवकरात लवकर जावं, अशी लोकांची इच्छा आहे. ज्यांनी भाजपला मतदान केलं, तेसुद्धा चूक केल्याचं मान्य करत आहेत. लोक चूक मान्य करत असले, तरी देशाला राजकीय पर्याय उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे, असं म्हणत तेजस्वी यादवांनी विरोधकांना एकत्र येण्याची हाक दिली.
माध्यमांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र बसावं आणि बोलावं, असं मला वाटतं. ती वेळ आता आली आहे आणि विरोधकांनी शक्य तितक्या लवकर एकमेकांशी बोलायला हवं. इतकंच नाही, तर ज्या दिवशी आपला पराभव झाला, त्या दिवसापासूनच आपण बोलणं सुरू करायला हवं होतं, असेही तेजस्वी यादव म्हणाले.
आम्ही बिहारपुरते मर्यादित आहोत. कुणी बंगालपुरतं मर्यादित आहे, कुणी महाराष्ट्र! त्यामुळे आपल्याला एकत्र यावं लागेल आणि प्रत्येक राज्यात जावं लागेल. प्रत्येक राज्यात जाऊन काय समस्या आहेत, हे लोकांना सांगावं लागेल. भाजपने जी आश्वासनं दिली होती, ती त्यांनी पूर्ण केलेली नाही, हे लोकांना सांगावं लागेल, अशी भूमिका तेजस्वी यादव यांनी यावेळी मांडली. सर्व विरोधकांना एकत्र येऊन लोकांच्या निदर्शनास समस्या आणून द्यावा लागलील. त्यांची मन वळवावी लागतील. आमच्यातील मतभेद आणि अहंकार काढून टाकावे लागतील. जिंकल्यानंतर काय, हा विचार बाजूला ठेवावा लागेल. जर देश राहिला, तरच कुणीतरी नेता होईल. काँग्रेसविषयी बोलताना यावेळी तेजस्वी यादव म्हणाले, काँग्रेसमधील समस्या तो पक्षच सोडवू शकतो. काँग्रेसला आणखी मजबूत होऊन बाहेर पडावं लागेल. काँग्रेसची २०० जागावर थेट भाजपशी आहे. त्यांनी त्या जागांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. उशीर करून काहीच मिळणार नाही. मैदानात उतरावं लागेल.

Leave a Reply