वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

धकाव रे शामराव !

वाहने तीन प्रकारची असतात ,
काही’ सेल्फ स्टार्ट ‘असतात
काही ‘ किक स्टार्ट ‘ असतात
तर काही ” धकाव रे शामराव ” टाईपची,धक्कामार असतात!
त्यातीलही काही तर
धक्का मारल्यावर सुद्धा
थोडा वेळ चालून , चित्रविचित्र आवाज करत बंद पडतात !
अशांना लोक खटारा किंवा भंगार म्हणतात !
पण तीअगदीच निरुपयोगीनसतात !
बाकी काही नाही तरी अंगणाची शोभा वाढवतातच वाढवतात !
काही माणसंसुद्धा अशीच असतात !
शोभेची !
अशी माणसं जेव्हा नेतृत्व करतात एखाद्या सरकारचं ,
तेव्हा आपला तो विलक्षण गुण , ते,
आपल्या सरकारलाही प्रदान करतात !
” आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना” म्हणत !
लोक मग अशा सरकारांना “बिघाडी सरकार” म्हणतात !
नावात त्याच्या ‘ आघाडी ‘ असली तरीही !

        कवी -- अनिल शेंडे।

Leave a Reply