ब्रिटनमधील करोना टाळेबंदी १९ जुलैपासून पूर्णपणे मागे घेणार

लंडन: ६ जुलै- ब्रिटनमधील करोना टाळेबंदी येत्या १५ जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येईल, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले, की निर्बंध मागे घेण्यासाठी वेळापत्रक ठरवण्यात येत आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजीद जावीद यांनी संसदेत सांगितले, की १९ जुलैपासून टाळेबंदी पूर्णपणे मागे घेण्यात येईल.
जॉन्सन म्हणाले, की टाळेबंदीचा शेवटचा टप्पा वेगळा राहील, त्यानंतर बहुदा टाळेबंदी करण्यात येणार नाही. आमच्या राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेने वेगाने लसीकरण करून मोठय़ा प्रमाणात प्रगती साधली आहे. आपण आता विषाणूसमवेत राहायला शिकलो आहोत. कोविड काळातील जोखीम टाळणे त्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यासाठी कुठलेही निष्कर्ष घाईने काढणे चुकीचे ठरेल.
दरम्यान, डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने म्हटले, की पब्लिक हेल्थ इंडिया या संस्थेने कोविड लशी प्रभावी असल्याचे दाखवून दिले. डेल्टा विषाणू पहिल्यांदा भारतात सापडला होता. आतापर्यंतच्या चाचण्यांनुसार फायझर व बायोएनटेकची लस त्यावर ९६ टक्के प्रभावी आहे.

Leave a Reply