वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

एक नार दोन यार !
( चाल – आज गोकुळात रंग ..)

सत्तेसाठी मीनं केले दोन दादले
नावानं माझ्या ते रोज रोज बोंबले ।।

खुर्चीसाठी एक नवं लफडं केलं मी
लग्नाच्या दादल्यास सोडले हो मी
नेसुचे मी सोडुनि डोईस बांधले
माय बाप देव देवी खुर्ची मानले ।।सत्तेसाठी ….

सतत विरोधात राहणे न मानवे
खुर्चिबिगर नाही मला कध्धी राहावे
खुर्चीसाठी मंथरेचे पाय धरले
खुर्चीसाठी गर्दभांना काका मानले ।।सत्तेसाठी ….

सांगा या विरोधकांना काय जाहले
नाव ठेवल्याविना अम्हा न सोडले
पाण्याविना मासे ना जिवंत राहिले
तत्वज्ञान साधे हेच लोक भुलले ।। सत्तेसाठी ….

              कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply