नागपूर जिल्ह्यात शिवसेना एकाकी

नागपूर:५ जुलै- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसीचे आरक्षण ५० टक्क्यांच्यावर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने नागपूर जिल्हा परिषदेतील १६ व पंचायत समितीमध्ये ३१ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. या रिक्त जागांवर १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत असून, यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राकाँ एकत्र निवडणूक रिंगणात असून, शिवसेनेला त्यांनी एकाकी पडले आहे.
या आघाडीत शिवसेनेला डावलण्यात आल्याने शिवसेना नेत्यात रोष निर्माण झाला आहे.
यासंदर्भात शिवसेना नेत्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. पूर्वी भाजपासोबत असताना शिवसेनेचेही ७-८ उमेदवार निवडून यायचे. आता मात्र मुख्यमंत्री सेनेचे असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी सक्रिय झाले असून, १६ पैकी काही जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे खा. कृपाल तुमाने हे प्रयत्नरत आहेत.

Leave a Reply