माजी मालगुजारी तलावात ५ फुटाचा मगर सापडला, बघ्यांनी केली गर्दी

चंद्रपूर : ३ जुलै – मूल तालुक्यातील सुशी दाबगाव गावानजिक असलेल्या माजी मालगुजारी तलावात ५ फुटाचा मगर सापडला असून, त्याला बघण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सुशी गावातील मामा तलावात मच्छी पालन होत असून, येथील मासेमारी समाज नेहमीच मासेमारी करीत असतात व पावसाळा आला की मास्याची बिजाई सोडतात. सकाळी तलावातातील बिजाई काढण्यासाठी तलावात जाळे पसरवले, तर त्यांना मगर दिसून आला. काहींनी तर मोठे मासे असावे, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, काठाला येताच मगराची पुष्टी झाली आणि त्यास पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. हा मगर ताडोबा-अंधारी नदीतून आला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Reply