वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

घोटाळ्यांचे दिवस !
( चाल – दिवस तुझे हे …)

दिवस घोटाळे करायचे
ईडीच्या जाळ्यात फसायचे ।।

आधी हे करतात चोरी
आणीक वरुन शिरजोरी
पडताच छापा रडायचे ।। ईडीच्या ..

सेनापती जरी अजीत
छाप्याने होतो तो फजीत
ऍक्शनला सूडबुद्धी म्हणायचे ।।ईडीच्या ..

येता बोलावणे ‘ त्यां ‘चे
दणाणतात धाबेच ‘ यां ‘ चे
ना ना ना नाटकं करायचे ।।ईडीच्या …

बीपी नि शूगर वाढे
आजार नवनवे जडे
‘ काका $ काका ‘आळवायचे।। ईडीच्या..

     कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply