धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र पाठविणार, पुसदमध्ये शुभारंभ

यवतमाळ: १ जुलै- ‘एक पत्र समाजासाठी, एक लाख पत्र मुख्यमंत्र्यांना ’ या अभियानाची सुरुवात धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल ढोले यांच्या हस्ते करण्यात आली. या अनुषंगाने येथून १० हजार पत्रे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पवन थोटे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सांगितले.
धनगर समाज गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत केला आहे. मात्र, राजकारण्यांनी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. प्रत्येक वेळेस मोर्चे, आंदोलन करूनसुद्धा सरकार दखल घेत नाही, असेही पत्रात नमूद आहे.
या कार्यक‘माला वसंत ढोके, लक्ष्मीप्रसाद वाघमोडे, पवन थोटे, सुभाष बोडखे, अशोक पोले, प्रभाकर म्हस्के, शाहूराज काकडे, प्रभाकर बोडखे, कैलास गायनर, महेश पाल, दिगंबर लोहटे, संभाजी गावंडे व इतर समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply