पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ – संजय राऊत

मुंबई : २९ जून – महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहे. त्यामुळे एखाद्या दुसऱ्या विषयावर मतभेद असू शकता पण नाराजी नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचे व्यवस्थित सुरू आहे’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच, पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. तसंच, ईडीकडून अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांच्या चौकशीवर भाष्य केलं.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही. सर्वकाही व्यवस्थित आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. पण केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. तीन वेगवेगळे पक्ष असल्यामुळे थोडे फार मतभेद होतीलच. पण, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात. पण नाराज कुणीच नाही, विरोधी पक्षाला हवे असलेले घडत नाही, त्यामुळे अफवा पसरवल्या जात आहे, असंही राऊत म्हणाले.
‘अनिल देशमुख, प्रताप सरनाईकांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांची कोंडी केली जात आहे. भाजपमध्ये धुतल्या तांदळाचे आहेत का? हरिश्चंद्राचे अवतार आहेत का ? तिन्ही पक्ष यावर एकत्र बसून पुढील वाटचाल ठरवली जाईल, असंही राऊत म्हणाले.
‘विरोधी पक्षाची भूमिका दिसत नाही. फडणवीस संन्यास घेण्याची भाषा करतात हे त्यांच्या पक्षाचे वैफल्य आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
‘अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट झाल्याची चर्चा रंगली होती. पण कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवारांनी केला आहे. पंतप्रधान मोदी- उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढायची गरज नाही. या दोन्ही बैठकांमागे काहीही राजकारण नाही. आजही मोदी हे ठाकरेंसाठी नरेंद्रभाई आहे’, असं विधानही राऊत यांनी केलं.
‘महाराष्ट्रात सध्याचे सरकार 5 वर्षे टिकणार हे ठामपणे सांगतो. सरकारमध्ये कुठलही मतभेद नाहीत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. निवडणूक कधीही झाली तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकेल, असंही राऊत म्हणाले.
‘कोरोनाचे पालन करत एकटाच फिरत आहे. भाजपलाच कोरोना झालाय. आम्ही खूप डेंजर आहोत. जेव्हा आम्हाला परिक्षा द्यायची तेव्हा देईन. परिक्षा सेट झाली आहे. कुणाचे काय फुटेल ते पहा, असंही राऊत म्हणाले.
‘मी त्यांना आठवड्यात दोनपेक्षा अधिक वेळा भेटलोय. मला पवारांशी भेटायला,ऐकायला आवडते. ज्याच्या मनात अपराधीपणाची भावना असते ते असे बोलतात. नैराशातून अशी वक्तव्ये येतात, असा टोलाही राऊत यांनी आशिष शेलार यांना लगावला.

Leave a Reply