धान खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा – खासदार सुनील मेंढे

भंडारा: २६ जून- भंडारा जिल्ह्यात सुरू असलेली धान खरेदी व त्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीला घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेत एक निवेदन दिले.
मोठ्या प्रमाणावर भंडारा जिल्ह्यात धान खरेदी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून केली जाते. मात्र, या खरेदी दरम्यान शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अन्यायासंदर्भात यापूर्वीही तक्रारी करून राज्य सरकारकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. हाच विषय घेऊन खासदार सुनील मुंडे यांनी दिल्ली येथे वाणिज्य मंत्री गोयल यांची भेट घेतली. धान खरेदीत कशाप्रकारे अफरातफर केली जात आहे हे यावेळी खासदारांनी मंत्री महोदयांना पटवून दिले. काही व्यापारी यात गुंतले असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच ‘वन नेशन-वन राशन’ योजनेची अंमलबजावणी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात होत नसल्याने अनेकांचा अधिकार डावलला जात असल्याचे सांगून या संदर्भात निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी भारतीय खाद्य महामंडळ कार्यकारी संचालक सुदीप सिंग, सहसचिव एस.जगन्नाथ, माजी आ.चरणभाऊ वाघमारे, बाळा काशीवर उपस्थित होते.

Leave a Reply