इम्रान यांचे काश्मीरबाबत नापाक तुणतुणे, चीनमधील मुस्लिमांबाबत मौन!

नवी दिल्ली : २२ जून – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परत एकदा काश्मीरबाबत आपले नापाक तुणतुणे वाजवले आहे. काश्मीरबाबत भारताने एकतर्फी निर्णय घेतला असून, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ठरावही भारताने ओलाांडले आहेत, असा आरोप इम्रान खान यांनी अमेरिकन माध्यमांसोबत बोलताना केला. भारताच्या या निर्णयामुळे आम्हाला व्यापार करण्यास अतिशय अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे ते म्हणाले.
काश्मीरचा प्रश्नो सुटल्यास पाकिस्तानला अण्वस्त्रांची गरज राहणार नाही, असे मत यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले. अमेरिकेने मध्यस्ती केली तर काश्मीरचा प्रश्न सुटू शकेल, असे सांगत त्यांनी भारताच्या अंतर्गत मुद्यात अमेरिकेला ओढले.
मुलाखती दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत कोणत्या मुद्द्यावर चर्चा कराल असा प्रश्नम विचारल्यावर ते म्हणाले, अमेरिकेवर मोठी जबाबदारी आहे, हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. काश्मीर एक ‘विवादित‘ क्षेत्र असून, काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यासाठी अमेरिकेने मध्यस्ती केल्यास प्रश्नय मार्गी लागेल.
भारत काश्मीरबाबतचा निर्णय परत घेत नाही तोपर्यंत आमचे संबंध चांगले होणार नाहीत, याचा पुनुरुच्चार त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे, चीनमधील मुस्लिमांच्या प्रश्नारबाबत विचारता त्यांनी माध्यमांशी बोलताना चक्क मौन बाळगले!

Leave a Reply