माजी सनदी अधिकारी ए. के. शर्मा उत्तरप्रदेश भाजपचे उपाध्यक्ष

लखनऊ : २० जून – भाजपच्या उत्तर प्रदेश शाखेने राज्य विधान परिषदेचे आमदार व माजी सनदी अधिकारी ए.के. शर्मा यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटस्थ मानले जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी या नेमणुकीची घोषणा केली. अधिकृत निवेदनाद्वारे सिंह यांनी लखनऊ येथील अर्चना मिश्रा व बुलंदशहरचे अमित वाल्मिकी यांची प्रदेश सचिव म्हणून नेमणूक केल्याचेही जाहीर केले.
वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले शर्मा यांनी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी ‘व्हायब्रंट गुजरात’ मोहीम यशस्वीरीत्या राबवून त्यांचा विश्वाास जिंकला होता. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पंतप्रधानांच्या योजनेनुसार काम करणाऱ्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालय या महत्त्वाच्या विभागाचे कामकाजही त्यांनी सांभाळले होते.

Leave a Reply