वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

शिवप्रसाद !

आज गेला शर्मा आत
वाझे त्याच्या आधी
इजा झाला बिजा झाला
तिजा आता कधी ?

दोघे पोलीस अधिकारी
मालक कोटी कोटींचे !
निष्ठावान ते होते श्वान
या अमुच्या मातोश्रीचे !

अनेक बंगले अनेक गाड्या
बघून होई गुंग मती !
जिच्या कृपेने आले सांगा
असेल तीही कशी सती ?

पगार त्यांचा छटाकभर नि
थाटबाट तो राजाचा !
सारा नखरा जाइल उतरून
शिवप्रसाद घ्या कर्माचा !

छोटे मध्यम गळा लागले
आता येतिल बडे बडे !
साम्राज्याला सम्राटांच्या
बसतिल आता तडे तडे !

  कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply