जरा खोलात जाऊन बघूया

टिशू संस्कृती….

भारत हा उष्ण कटिबंधातील देश आहे. काही पहाडी भाग (जिथे बर्फ असतो )सोडला तर बहुतांशी भाग हा उष्ण …त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ ,जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुणे ,शौचासाठी पाण्याचा वापर करणे हा आपल्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे. सैलसर कपडे घालणे हासुद्धा एक इथल्या जलवायु चाच परिणाम आहे. तसेच पूर्वेकडील देश जिथे सतत बर्फ पडतो ,काही उन्हाळ्याचे दिवस सोडले तर प्रचंड थंडी असते त्यांनी टिश्यू पेपर्स चा वापर सुरू केला.. बंद गळ्याचे कपडे ,फुल पॅन्ट ,टाय ,बो,पायात बूट ही तेथील वातावरणाला उपयोगी अशी वेशभूषा आहे .या विविध देशात विभिन्न जलवायु मुळे खानपान, वेशभूषा,इ. भिन्न असणारच .परंतू कारण नसताना एका संस्कृतीची दुसऱ्याने नक्कल करता कामा नये .
मॉलमध्ये ,हॉटेलमध्ये इतकच काय (स्ट्रीट फूड) गल्लीतील छोटे छोटे स्टॉल्स देखील आजकाल टाॅवेल टिश्यू ज ठेवतात .
माॅल मध्ये टॉयलेटला गेलं की मोठा टिशू पेपरचा रोल असतो .नसेल किंवा संपला असेल तर मोठ्या आवेशात आपण तेथील कामगारांना म्हणतो.. “टिशू पेपर नही है.. रखो”… मग बेसिन वर हात धुतल्यावर टिशूज़ ओढून ओढून हात पुसतो… कारण ते इतके नरम आणि पातळ असतात की तीन-चार तरी लागतातच आणि मग फेकून देतो…लहान मुलं आपल्याला पाहतात आणि त्यापेक्षा जास्तच नासाडी करतात.. त्यानंतर हिटर च्या खाली हात ठेवून हात गरम करायचे आणि गंमत अशी की तरीही ते सुकत नाहीत म्हणून बाहेर येऊन आपला रुमाल काढायचा किंवा अंगालाच हात पुसायचे (अर्थातच कोणी पहात नाही याचं भान ठेवूनच ) .
अशा या टिश्यू बनवण्यासाठी फ्रेश कट म्हणजे जिवंत झाडे लागतात .फेस टिशूज़ जे की अत्यंत मुलायम आणि पांढरेशुभ्र असतात यासाठी तर वर्जिन पल्प हवा असतो म्हणजे झाडांचा ताजा पल्प आणि तोही रिसायकल न केलेल्या वस्तू पासून बनवल्या जातो ..
टॉयलेट पेपर हा मुलायम परंतु मजबूत असतो ही मजबुती येण्यासाठी पाईन आणि फर ही झाडं तोडण्यात येतात आणि मुलायमपणा हा पाईन आणि मेपल झाडांच्या वर्जिन पल्प पासून मिळतो ..
यासाठी स्प्रूस, लार्च ही झाडं पण कापली जातात ..कठीण लाकूड म्हणजे hard wood हे युकॅलिप्टस aspen आणि birch या झाडांपासून मिळवण्यात येतो…
टॉयलेट पेपर हा अंदाजे 70 टक्के कठीण लाकूड आणि 30 टक्के नरम लाकडापासून बनवल्या जातो त्यात पाणी आणि इतर केमिकल्स ही वापरल्या जातात .
एक टॉयलेट पेपर रोल बनवण्यासाठी झाडं तर लागतातच आणि 37 गॅलन पाणी लागतं ..
आणि जेवढी कागद बनवल्या जातात त्याचा 35 टक्के हा भाग फक्त टिशू पेपर असतो .एका दिवसात 27,000 झाडे कापली जातात म्हणजेच वर्षाचे किती असतील विचारच करावा.. एकीकडे इमारतींसाठी वृक्षतोड होत असते.. फर्निचर साठी लाकड़ हवी असतात.. लोकसंख्या वाढत चालली त्यामुळे निवाऱ्यासाठी जागा हवी…या न त्या कारणांसाठी जंगल ची जंगल आपण नष्ट करून टाकलीत.. त्यात भर पडलाय टिशू पेपर चा…
तज्ञ म्हणतात जर ही वृक्षतोड अशीच सुरू राहिली तर 100 वर्षांनंतर आपणच नष्ट होऊ …
असे सगळे तथ्य कळल्यावर अंगातून भिंती ची शिरशिरी उठली…
पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण सर्वांनी जर ठरवलं की टिशू पेपर वापरणार नाही तर डिमांड आणि सप्लाय यांची साखळी आपण तोडणार आहोत अर्थातच टिश्यू पेपर ची मागणीच संपली तर वृक्षतोड बंद होईल ..
आता सर्वात मोठा किंतु परंतु….की…एकट्याने काय होणार आहे .लोक कुठे ऐकतात का ?असं म्हणून चालणार नाही .आपण सुरुवात करू या आपले नातेवाईक आपल्या मैत्रिणी या निश्चितच आपलं ऐकतील आणि आपल्या पृथ्वीच्या तेला वाचवण्यासाठी हातभार लावतील.
नुसतं सकाळी उठून हात जोडून…
विष्णु पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे….
म्हणून चालणार नाहीये….
आपल्याला शपथ घ्यावी लागेल की आम्ही टिशू पेपर वापरणार नाही त्याऐवजी पाणी वापरू रुमाल किंवा नॅपकिन जवळ ठेवू या..

मग घेऊयात शपथ…शुभ्र शीघ्रम…

(समाजमाध्यमांवरून संकलित)

Leave a Reply