पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती – निलेश राणेंचा अजित पवारांना सवाल

रत्नागिरी : ७ जून – माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दिलेल्या प्रतिक्रियेवर निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
निलेश राणेंनी ट्विट करुन अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये, असं निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एवढंच काय तर पहाटेच्या शपथविधीवरुनही निलेश राणेंनी त्यांना चिमटा काढला आहे. मारला आहे. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असं म्हणत निलेश राणेंनी ट्विटमध्ये अजित पवारांना टोमणा मारला.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार हे चारवेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली होती.
नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण? ही काय पद्धत झाली का? हे इतक्या वेळी मुख्यमंत्री होते, ते तितक्या वेळी मुख्यमंत्री होते. इतर वेळी म्हणायचं शरद पवार आमचे नेते आहेत. शरद पवारांचं वाकून दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण काहीतरी वेगळं सांगतोय, असं करून शरद पवारांबद्दल अशाप्रकारचं वक्तव्य करायचं, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती.

Leave a Reply