बनावट बॉम्ब अंगावर बांधून बँक लुटण्याचा प्रयत्न फसला, आरोपी अटकेत

वर्धा : ५ जून – अंगावर बॉम्ब लाऊन बँक लुटण्याचे प्रकार आपण चित्रपटांमध्ये बघितले आहेत. मात्र, अशीच काहीशी घटना वर्धेच्या सेवाग्राम येथील बँकेत घडत होती. पण बँकेतील अधिकाऱ्यांच्या चपळाईने संबंधित आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. विशेष म्हणजे आरोपीने बनावट बॉम्ब बनवून बँकेच्या कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक करत त्याच्याकडील साहित्य जप्त केलं. आरोपीने आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून पैसे न दिल्यास सर्वांना संपवण्याची धमकी पत्रातून दिली होती
वर्धेतील सेवाग्राम पोलीस ठाण्यासमोरच सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या व्यक्तीने बँक शिपायाच्या डोक्याला एअर पिस्तूल लावून पैशांची मागणी केली. पुढे तो त्याला खाली घेऊन आला. त्यानंतर त्याने पिस्तूल लपवली आणि शिपायाच्या हातात पत्र दिलं. शिपायाने ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला.
बँकेच्या व्यवस्थापकांनी तक्रार समजून पत्र वाचलं. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यात आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून मी सुसाईड बॉम्बर असून बँकेत येताच बॉम्ब अॅक्टीव्ह केलाय. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलावू नये, अन्यथा सर्वांना उडवून देईल, अशी धमकी त्या पत्रात होती. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी समयसूचकता दर्शवून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना आरोपीस बेड्या ठोकण्यात यश आलं.
बँकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती मिळताच तातडीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बँक गाठली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी कुठलाही वेळ न दवडता त्यास पकडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कमरलेला गुंडाळलेलं बनावट बॉम्बसदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केलंय. कमरेला गुंडाळलेल्या सहा लालसर रंगाच्या पाईपच्या कांड्या, वायर वगैरे छोटे डिजीटल वॉच, जोडलेली बॉम्ब सदृश्य दिसेल असं तयार होतं. त्यात विस्फोटक नव्हते. प्लास्टिकच्या पाईपमध्ये पीओपी भरलं होतं बॉम्बसदृष्य दिसत होतं.
आरोपीने पिस्तूल ऑनलाईन मागवल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलंय. पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली. या आरोपीचं नाव योगेश कुबडे असं आहे. आरोपीचा सायबर कॅफे असून त्यावरील कर्जाच परतफेड करण्यासाठी नैराश्यातून हा प्रकार केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली.

Leave a Reply