सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

रोखठोक ला सडेतोड

आमचे “रोखठोक” वाले संपादक साहेब म्हणजे एकदम जयचंदी खडुस आगपाखडू. एखाद्याशी वैर घेतले की बघा आमचे जयचंद संपादक त्याची वृत्तपत्रातून आगपाखड करीत पुर्ण वासलात लावतात, त्याचा गुळगुळीत गोटा करतात, बिना तेलाची चंपी करतात. समोरचा वैरी कितीही चांगला असेल तरीही त्याच्याबद्दल संपादक साहेब आपल्या चष्म्यातून लोकांपर्यंत शब्दच्छलाने सगळा वाईटपणा त्या वै-यावर वृत्तपत्रात ओतणार आणि पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करणार की आपला वैरी खोटारडा कसा आणि आम्ही …. फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ कसे?????? संपादक साहेबांची गेले दीड वर्ष आपल्या वृत्तपत्रातून आगपाखड सुरू आहे, भाजपा वर ………..जयचंदी संपादक साहेब …..जयचंदानी सुद्धा पाला बदलला होता…… फितुर झाला होता….. पण अशी जहाल आगपाखड……..!!!!!!!!इतकी आगपाखड की वृत्तपत्र हातात घेतले की हाताला चटका लागावा… काय तुमचे लिहीणे कसले इरसाल शब्द? वै-याबद्दल, अर्धवट मजकुराने, वाचणा-यांची दिशाभूल…
मात्र…….. ज्यांच्यावर विश्वास टाकून सरकार स्थापन झाले, त्यांच्याविषयी तुमचे मिडिया तील बोल, त्यांच्यावर स्तुती सुमने…..बहारो फुल बरसाओ…….शंभर जन्म लागतील समयाधीशांना समजायला. वाझे एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी, परमबीर – आमचा कर्तव्यदक्ष अधिकारी. आता कुठे आहे वाझे? परमबीर साठी काय झाले, त्याने तर बोंबाबोंब केली तुमच्या सरकारची…. आणि सोशल मिडिया चा वापर करीत ज्यांच्यावर स्तुती सुमनं उधळली त्याच मिडिया न्युज चा वापर करीत, तुम्ही त्यांना शिव्या दिल्या……. पत्रकार संपादक तोच्…. पण काही दिवसात च् तुमचे मत ह्या दोघांबद्दल एकदम विपरीत…बसा बोंबलत. कालाय तस्मै नमः.. अजून काय?
संपादक महोदय.
संपादक हा चौफेर नजर ठेवून आपले खरे वृत्त, जनतेसमोर ठेवत असतो, अशा प्रतिभावान व्यक्तिला संपादक म्हणतात जे आपल्या पत्रकारितेशी एकनिष्ठ आहेत. आणि जो संपादक आपला व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी वृत्तपत्राचे रकाने भरवतात इंग्रजी भाषेत त्यांना ,”Prestitute” म्हणतात आणि हा शब्द मराठी भाषेत “छिनाल” शब्दाच्या जवळपासचा मानला जातो.
तर आपला जो मुद्दा होता की “व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणजे सध्याचा सोशल मीडिया. देशभरात या स्वैराचाराने धुमाकूळ घातला आहे” जयचंदी संपादक साहेब, ह्या वाक्यात सोशल मिडिया बरोबर आपल्या वृत्तपत्राचे नाव घालणे सोयिस्करपणे विसरलात. ह्याला म्हणतात वृत्तपत्राचा स्वैराचार. ह्याला म्हणतात पत्रकारितेतील स्वैराचार. तुमच्यासारख्या मातीखाऊ संपादकांमुळे भारतातील पत्रकारितेचा क्रमांक आज १८० मधुन १४२ वा आहे. आणि भारताचे स्थान पत्रकारितेत सध्या तरी “निकृष्ट” श्रेणी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आणि संपादक साहेब गप्पा झोडताहेत वैचारिक स्वैराचारावर. “लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण”.
संपादक साहेब “पप्पू” शब्दावर परत धुरळा उडवता आहात तुम्ही. “पप्पू” हा शब्द मान्यवर नवज्योतसिंग सिद्धू ची प्रसुती आहे. हे सांगण्याचे तुम्ही सोयिस्करपणे विसरता, नव्हे तुमच्यात हिंमत नाही – खरे बोल लिहायची आणि हे तुमच्या पत्रकारितेचे दिवाळे आहे.
जेव्हा पाकिस्तान चा पंतप्रधान नवाज शरीफ तेव्हाचे भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग ह्यांना “देहाती औरत” म्हणाला होता आणि तुमचा मित्रपक्ष मौन होता ही गोष्ट आमच्या – सामान्य माणसाच्या जिव्हारी लागते. तुमच्यासाठी हा राजकारणाचा विषय असला तरी भारताचा नागरिक म्हणून जेव्हा छिलुट देशाचा, चोरीचे आरोप लागलेला पंतप्रधान आमच्या भारताच्या बलाढ्य देशाच्या पंतप्रधानाला हलक्या दर्जात घेतो, जगासमोर त्याची प्रतिमा असंवैधानिक भाषेत निर्लज्ज पणे मांडतो, जगभरासमोर भारताचे हसे होते. जगासमोर भारताची प्रतिमा डागाळली जाते आणि आमची कॉंग्रेसी आणि तत्सम पक्षांनी भरलेली संसद मौन राहते, हा प्रमाद कितीतरी मोठा आहे, प्रत्यक्ष मौनी बाबाला – “मौनी बाबा” म्हणण्यापेक्षा?

ज्या इंदिरा गांधींनी स्वतः च्या प्रतिष्ठेसाठी देशाला धारेवर धरून आणिबाणी लावली, त्याच इंदिरा गांधींनी खलिस्तानला पण खतपाणी घातले होते, आणि आता तीच् खलिस्तानी वृत्ती परत एकदा आपल्या भारतात अराजक माजवत आहे. “किसान आंदोलन” हे त्यांचे द्योतक आहे असे म्हणायला हरकत नाही. हे मात्र संपादक साहेब लिहायला विसरतात.
भाजपाने सोशल मीडिया ला वापरून त्याचा न्यायोचित, देशाच्या संविधानाची प्रतिष्ठा कायम ठेवत त्याचा यथोचित उपयोग केला. पण आजकाल सोशल मीडिया फेक नावाने वापरून कोणीही कसा ही त्याचा उपयोग करीत आहे. त्यावर उपाय म्हणून सोशल मिडिया किंवा तत्सम मिडिया शी “आधारकार्ड” संलग्न करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून आला होता. पण इतर सर्व पक्षांनी तो फेटाळला कारण कित्येक अकाउंट धारी , खोट्या नावाने सोशल मीडिया अकाउंट चालवतात आणि सोशल मीडियावर त्याचा उपयोग भारताविरुद्ध षडयंत्र चालविण्याचा अड्डा झाला आहे, हे मात्र आमचे संपादक साहेब लपवुन ठेवतात आणि त्यामुळे केंद्र सरकारला सोशल मीडिया वर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळेस तुमच्यामधला जयचंदी पत्रकार आक्षेप घेत, रडतखडत उभा होतो आणि मोदी ना शिव्या घालण्यात धन्यता मानतो.
संपादक साहेब, तुम्ही रान उठवा आपल्या पेपर मध्ये की सोशल मिडिया शी आधारकार्ड लिंक करा. पण सोशल मिडिया चालू ठेवा – बघा केंद्र सरकार तुमचे ऐकते की नाही. आणि बघा तुमचा जिवश्च कंठश्च – नानाविध रंगाने भरलेला पक्षा तुम्हाला कसा टोलवतो ? बघा तुमच्या पत्रकारितेचे तुमचे मित्र पक्ष कसे दिवाळे काढतात ते? स्वच्छ पारदर्शिता कोणालाही नको आहे. आणि सोशल मिडिया वर असे देशहिताविरुद्ध अफवांचे पीक पेरायचे रान उठवले जाते, तेव्हा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मौनी बाबा सारखा हा प्रधानमंत्री नाही, दोन पंतप्रधानांची तुलना पण करता येणार नाही.देशहितासाठी कठोर निर्णय घेऊन कार्यान्वित करणे, ह्यासाठी मोदी कटिबद्ध आहे आणि ही खरी इतर पक्षांची दुखती रग आहे.
खरी पत्रकारिता सोडुन जेव्हा संपादक साहेब, टुकार मुद्दे उचलतात नं त्यावेळी समजंत् नाही समोरच्याला काय बोलावे? आठवा तुमची पत्रकार परिषद – WHO ला सल्ले देणारा तुमचा मालक? तुमच्या ह्या अतिप्रचंड उत्साहामुळे अशा फालतू प्रश्नापुढे- हतबल निश:ब्द केला त्याला तुम्ही. अरे, पहिले सांगायचे तरी मालकाला की हा प्रश्न मी मध्येच घुसडणार आहे – मालक उत्तर तयार ठेवा. खिल्ली उडविली तुमच्या मुलाखतीची पर्यायाने तुमच्या मालकाची.
संपादक साहेब अशा मुलाखतींचा एक विशिष्ट स्तर असतो. जनता त्या सत्ताधीशाला ऐकायला बसली असते. तुमच्या मालकाला नाही. पहिले स्वतः ला एका स्तरावर आणुन नंतर बोला. पहिले जयचंद – पगारदार नोकर संपादक ह्या भुमिकेतून बाहेर पडा आणि राज्याला, देशाला, राज्यहित, देशहिताला त्रयस्थ नजरेने बघा, ख-या पत्रकारितेसाठी. एका घराण्याचा पगारदार म्हणून पत्रकारिता करांल तर तुमचा पत्रकारितेचा स्तरसुद्धा चाकरमानी पेशातील राहणार.तुमच्या मुलाखती म्हणजे खळखळून हसवणारा लॉरेल-हार्डी चा शो….साखर घरात म्हणून गृहमंत्री बायको…. वगैरे वगैरे….
कॉंग्रेस टुल कीट – संपादक साहेब, कॉंग्रेस आज सत्तर वर्षानंतर एका अशा पंतप्रधानाला बघत आहे,” न भुतो न भविष्यती” अशा पंतप्रधानाचा सामना करीत आहे. जो इमानदार आहे, राष्ट्रवाद, देशाचा स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठ, भ्रष्टाचार मुक्त अशा पंतप्रधानांना भारतच् नव्हे तर सगळं जग अनुभवत आहे. त्यांनी जगभरात भारताची ६ वर्षात उंचावलेली प्रतिमा आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत लडबडलेली कॉंग्रेस….. कॉंग्रेस त्यांच्या जवळ असणा-या पैशाच्या दमवर सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा ओतायला आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल तो डाव खेळायला तयार असते. त्यात “टूलकिट” जर संविधानाच्या विपरीत वापरले जात असेल तर निश्चितपणे दोषींवर कारवाई करायला हवी. दोषी सोशल मिडिया असेल तर सोशल मिडिया वर कारवाई करायला हवी. त्यात राष्ट्रहित जोपासण्यासाठी जर कारवाई होणार असेल तर तुम्ही जळफळाट कशापायी करताय? तुम्ही त्यातील ख-या पैलुंची वास्तपुस्त करीत वास्तव जनतेसमोर मांडायचे तर तुम्हीच् निर्भीड पत्रकारितेची वासलात लावताय. तर तुम्ही आणि वैचारिक स्वैराचार करणारी सोशल मीडिया ह्यात अंतर काय?

मोदी – …..- मोदी आहेत. आजवर तुम्ही कितीही त्यांचेवर टूलकिट वगैरे चे शस्त्र चालविले तरी ते निष्प्रभ ठरतील. कारण तो एक कर्मनिष्ठ कर्मयोगी आहे.
मोदी सामान्य जनतेचा, गरीब रयतेचा विचार करतात आणि तुमच्यासारखे राजकारणी केंद्राचा पैसा कसा ऐठायचा आणि मोदी ला त्रास कसा द्यायचा ह्याचा विचार करतात.
आपला तो दिल्लीचा “खासीराम कोतवाल” आज ५ टन आॅक्सीजन चाहिए, दुसरे दिन ७ टन आॅक्सीजन चाहिए, तिसरे दिन ९ टन आॅक्सीजन चाहिए। केंद्र आॅडिट बसवतो म्हटल्याबरोबर सब आलबेल आणि काळाबाजार करणारा कालरा, खासीराम कोतवालचा निकटवर्ती पकडला जातो. हे काय दर्शवते!!??
संपादक साहेब, मोदी इतका इमानदार आहे पण त्याची आई बघा!!!!! समाधानी आहे त्याच् जुन्या घरात. तेच् छोटेसे पण समाधानी घर आणि त्यांची सुखात राहणारी, भ्रष्टाचाराचा घरात मागमूसही नाही, एका अभेद्य वाघाला जन्म देणारी शतायुषी आई. शतवार वंदन तिला.
इतके वर्षांत मोदी वर एक पैशाचा डाग नाही आणि तुम्ही स्वतः चीच बघा एका टरकण्यात ५२ लाख…… आणि निघाले गुरू घंटाल – मोदी ला ज्ञान पाजायला.
तुमचे दुसरे लक्ष मोदींनी सेन्ट्रल व्हिस्टावर खर्च करु नये…… संपादक साहेब….. कसली फालतू पत्रकारिता करताहात……तुमचा केस करणारा बापू – केस हारला….पिछवाड्यात एक लाखाच्या दंडाची पुंगळी घालून फिरतोय, न्यायालयानी त्याची दोन्ही टरबुजं सोललीत आणि तुम्ही तोच् तोच् विषय मोदी विरुद्ध वापरून, सोशल मिडिया प्रमाणे पत्रकारितेचा वृत्तपत्रातून स्वैराचार करणार आणि सामान्य जनतेला शब्दच्छलाने भ्रमित करणार. आणि त्याला त्याला,”रोखठोक” नाव देवून छातीठोक झुठ बोलणार. डोमल्याची पत्रकारिता तुमची, एका मोठ्या हिंदू हृदय सम्राटानी नेमुन दिलेल्या संपादकाची काळानुसार अॅपटलेली भ्रमनिरास पत्रकारिता.
कालाय तस्मै नमः.. अजुन काय? हिंदू हृदय सम्राट गेले आणि तुमच्यातल्या मंदबुद्धी राजकारणाने त्यांना “जनाब” करून टाकलं.
ट्विटरने ट्रंपचा अकाउंट बंद केला???? तर काय ट्विटर अमेरिका पेक्षा मोठा झाला का? आणि तेच ट्विटर जर मोदींची गयावया करते???? ह्याला काय म्हणायचे? संपादक साहेब.
संपादक साहेब, जितके रोखठोक तुम्ही लिहिले आहे त्याला सडेतोड सांगतो आहे. पहिले स्वतः वास्तवाशी “सामना” करायला शिका, पत वाढवा, पारदर्शिता वाढवा. माजी सरकार सारखं चतुरस्त्र विचार करण्याची क्षमता ठेवा. वृत्तपत्र जर चालवायचे असेल तर खरंखुरं पारदर्शी लिखाण तुमच्याच पथ्यावर पडेल. कारण माजी सरकार म्हणते तसे कोरोना नंतर “सरकार” पडेल. माजी सरकार समयाधीशांना भेटले, माजी भाजपा मित्राला भेटले. माजी भाजपा मित्र परत समयाधीशांना भेटले….काय होणार भविष्यात हे तुम्हाला सुद्धा चांगले माहिती आहे, ५० वर्षे सरकार टिकणार वगैरे फुकाच्या वल्गना घरात हॅंगरला टांगून ठेवा………जनतेसमोर उघडपणे वाच्यता करू नका……..शंभर जन्म लागतील समजायला……ते दीड वर्षात तुम्हाला समजले…. ह्यात सगळे आले…. कोणी कोणाला कान पिचक्या दिल्या हे आज तुमच्या बॉडी लॅंग्वेज वरून स्पष्ट कळले.
तुमचे वृत्तपत्र आणि तुमच्या बातम्या हे सगळे सोशल मिडिया सारखे वैचारिक स्वैराचाराचे आणि लडबडलेल्या स्वार्थाने ओतप्रोत, शत्रू वर पारदर्शीता लपवून सामान्य जनतेची दिशाभूल करणारी , राज्यहित आणि राष्ट्रहित विरोधी म्हणायला भरपूर वाव आहे. त्यासाठी बाकी लोकांना ज्ञान पेलण्यापेक्षा, स्वतः कडे दाखवणा-या तीन बोटांची कदर करा. नाही तर सोशल मिडिया बंदी चा पहिला “सामना” तुम्हाला करावा लागु शकतो.

जय हिंद-जय महाराष्ट्र-जय भारत

भाई देवघरे

Leave a Reply