वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे

उधारीचं पोर ….

“काही लोकांना दुसऱ्याचं पोर
कडेवर घेऊन माझं म्हणून नाचण्यात आनन्द वाटतो!”
” मग त्यात वाईट काय आहे ?
“वसुधैव कुटुंबकम् ।” ही तर
आपली संस्कृतीच आहे !”

कोणी म्हणतात, त्यांना दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय लाटायची सवयच आहे!
मी म्हणतो त्यातही वाईट काय आहे ?
खरं तर यातही त्यांचा मनाचा मोठेपणाचं दिसायला हवा !

साऱ्यांना आपलं म्हणण्याचा त्यांचा उमदेपणा त्यात बघायला हवा !
तो जर माझा ( भलेही शत्रू )आहे , तर ,
त्याने केलेलं कामही माझंच आहे !
असं म्हटलं तर त्यात वावगं काय आहे ?

त्यांनी मेहनत घेतली, काम सुरू केलं आणि यांनी पूर्णत्वाची हिरवी झेंडी दाखवली इतकंच !

एकीकडे काम करत नाही म्हणून बोंबा ठोकता !
आणि काही “करून दाखवलं” तर बोटं मोडता ?

जरा सकारात्मक विचार करायला शिका राजेहो !
‘आरे ‘ला जरा कारे केलं तर बिघडलं कुठे राजेहो !

कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply