सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप

काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिढीतील राजेंची मुलखावेगळी पत्रपरिषद बघितली आणि उडालोच्……
राजे एक प्रचंड सामर्थ्यवान शब्द. हा शब्द आपल्या स्वराज्याची प्रगतीची दिशा निश्चित करतो. प्रजेला मार्गदर्शन करून त्यांच्या महत्वाकांक्षेला प्रगती चे पंख देणारा मार्गदर्शक म्हणजे “राजा”, प्रजेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी अहोरात्र झटणारा,जनतेचा सेवेकरी – म्हणजे राजा. मार्ग चुकलेल्या जनतेला योग्य मार्ग दाखविणारा, रास्त रस्त्यावर आणुन ठेवणारा तो “राजा”.
कालची पत्रकार परिषद बघितली आणि वाईट वाटले. आपल्या “मराठा समाजाला” मागासवर्गीय समाजात स्थान मिळावे म्हणून राजे झटत आहेत. आजपर्यंत घरात बसलेले खासदार राजे पहिल्यांदा रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री, समयाधीश, माजी सरकार, आजी सरकार, सरकारच्या आतले, सरकारच्या बाहेरचे ह्या सर्वांना ते कामाला लावणार!!!!!!!
कशासाठी???????
माझा प्रगत असलेला, आर्थिक आघाडीवर खणखणीत सक्षम असणारा माझा समाज, सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य चालवणारा माझा मराठा समाज……ह्याला “मागासवर्गीय घोषित करा”, ह्यासाठी राजे आघाडीवर….
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप!
भगवंताची लीला अगाध आहे. एका घराण्यात एकच् कर्तृत्ववान, धुरंधर व्यक्ती जन्माला येत असतो. त्याच्यानंतर च्या पिढ्या त्या व्यक्तीच्या वलयाचे वंशज म्हणून जगत असतात. त्या पिढ्यांतील कर्तृत्व देखील पिढी दर पीढी कमी कमी होत जाते आणि फक्त त्या एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या वलयाखाली, पुढल्या पिढ्या चेपून जातात आणि सातशे पिढ्यांसाठी जमलेली आणि हिश्श्याला आलेली संपत्ती उपभोग घेत आयुष्य उपभोगत असतात.
मैसूर चा राजा कृष्णराजा वडियार चतुर्थ इ.स. १८९७ मध्ये “अंबा विलास महाल अर्जून मैसूर पॅलेस” बनवला, त्यानंतर दुसरा महाल १९१२ मध्ये बनवला. काय ती भव्य दिव्य शान, काय असेल त्या राजवाड्याची रौनक त्यावेळेसची!!!!!! नुसता कल्पनाविलास करा आणि थक्क व्हायला होतं तुम्हाला….. पण नंतर तरच्या पिढ्या ?????? हळूहळू कसोटी कस लागणं कमी झालं की तुमच्यातल्या कर्तृत्वाला गंज लागायला सुरुवात होते, नंतर प्रचंड संपत्ती असली की पुढल्या पिढ्या ऐशोआरामाच्या जीवनात कर्तृत्वहीन होतात आणि हळूहळू कर्तृत्व हीन होतात. आज बघा मैसूर पॅलेस तिकीटा साठी उघडा केला आणि आताचा वंशज राजा तिकीटा वर आपली उपजीविका चालवित आहे.
असेच काहीसे जोधपूर, उदयपूर ह्या राजांच्या उपजिविकेचे साधन म्हणजे किल्ल्यांची तिकीट विक्री आणि काही महालात उघडलेले पंचतारांकित हॉटेल आणि राजघराण्यात जन्म झाला म्हणून मानमरातब ह्यात रमलेली ऐय्याश भरी जिंदगी.
अशा राजाच्या वंशाकडुन आता ख-या मार्गदर्शनाची अपेक्षा निष्फळ आहे.
अरे! जो राजाचा वंशज टीव्ही वर जेव्हा पक्ष बदलतो त्यावेळी जेव्हा कॉलर ला उडवत् एक बार मैने कमिट कर दिया तो…… असा डायलॉग गमावलेल्या आत्मविश्वासाने म्हणतो….. आणि एका चेह-यावर भाव मात्र घाबरलेले……..अशा वंशजाला …… छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणावे लागते पण त्यांच्यामध्ये कुठलीही मार्गदर्शन पर क्षमता नसते आणि असे लोक स्वतः च्या आयुष्यात मस्त असतात.

वंशावळी चे नाव घेतले तर चला थोडा अभिनय थोडा क्रिकेट हो जाए…..
अभिनयाचा शहंशाह, रुपेरी पडद्याचा आपल्या जमान्याचा अनिभिषिक्त सम्राट…… अमिताभ बच्चन….त्यानंतर अभिषेक बच्चन ला ओढुन ताणुन बापाच्या नावाखाली पिक्चरमध्ये घुसवलेले, पहिला पिक्चर “रेफ्युजी” करीना कपूर बरोबर…. लोकांनी पहिला वहिला म्हणून पाहिला. नंतर “तेरा जादु चल गया” साठी बच्चन कुटुंबिय खूप आस लावून बसले होते की बेटे का जादु चल जाएगा …..ही गोष्ट २००० ची गेल्या वीस वर्षांत अभिषेक बच्चन चा जादू फक्त ऐश्वर्या वर चालली पण अमिताभ बच्चन च्या नखाची ही अभिनयाची उंची तो गाठु शकला नाही. आणि जनमानसात स्वतः चे हसे करून बसला आहे, तो आजतागायत, परिस्थिती जैसे थे……
क्रिकेट मध्ये देवता सचिन तेंडुलकर….. त्याचा मुलगा…. बापाच्या वलयाचा कर्तृत्ववान बापाचा, पोराला लाभ होतो……. मुंबई कडून आयपीएल मध्ये २० लाखात घेतले जाते पण मैदानात यायचा चान्स मिळत नाही.
बस हीच् गोष्ट सांगावीशी वाटते की छत्रपतींच्या वंशात आहे म्हणून त्यांना खुप कर्तबगार आहेत वगैरे काही नसते.
आताचे जर राजांनी आवाज उठवला असता की आर्थिक आणि मनगटात बळ असणा-या मराठा समाजाला आरक्षण तर नकोच. आम्ही आणि आमचा समाज प्रगत अवस्थेत मार्गक्रमण करीत आहे.
पण आता सत्तर वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा मान राखित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत स्पष्ट लिहिले आहे की या सवलतीचा लाभ फक्त दहा वर्षे देण्यात यावा.आता सत्तर वर्षे झालीत तरीही सवलत चालू आहे आणि आमच्या प्रगत समाजाला हा मोठा अडसर आहे, तरी देशातील सर्व आरक्षण रद्द करण्यात यावे तर राजेंना मानलं असता की वंशात छत्रपती शिवाजी महाराजांची धग कायम आहे. पण हाच् राजा आम्हाला पण तुमच्या मागासवर्गीय कोट्यात घुसवा ही गळ घालतोय…..हा अजागळ, विचार हीन राजा…
राजे हो माझा समाज “मागासवर्गीय” आहे हे सांगणारा राजा…… आज शाहू महाराजांचे दाखले देत सांगतो आहे….. आम्हाला मागासवर्गीय घोषित करा….काय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे लक्षण आहे का???
हा सवाल वाचकांवर सोपवितो……

भाई देवघरे

Leave a Reply