श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ

नागपूर : १९ जानेवारी – श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे. सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहत घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
श्याम माधव हे फक्त हिंदु धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करतायेत. आजच्या सभेत त्यांनी धिरेंद्र कृष्ण महराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला, असा आरोप तरुणांकडून करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सध्या धीरेंद्र महाराज हे रामकथा प्रवचनासाठी नागपूरमध्ये आलेले आहेत. यादरम्यान अंधश्रध्दा निर्मुलनासाठी काम करणाऱ्या श्याम माधव यांनी त्यांच्या कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्याविरोधात पुरावे देऊन ही गुन्हा दाखल होत नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच त्यांनी राज्यातील अनिसच्या कामाचा उल्लेख देखील केला.
दरम्यान त्यांचे भाषण संपताच अचानक सभागृहात संपुर्ण शांतपणे बसलेल्या तरुणांनी जागेवर उभे राहुण घोषणा द्यायला सुरू केली. श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांची कुठलीही पोलखोल केली नसल्याचा आरोप केला. हिंदू धर्माला बदनाम केल्याचा आरोप त्या तरुणांकडून करण्यात आला.

Leave a Reply