नेपाळमध्ये ७२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, ५ भारतीयांसह सर्व प्रवासी ठार

नवी दिल्ली : १५ जानेवारी – नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.
नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वी रविवारी 72 आसनी प्रवासी विमान कोसळले. या विमान अपघातात सर्व 72 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आला असून बचावकार्य सुरु आहे.
पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त आहे. हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.
हे विमान अपघातग्रस्त होताच विमानाला भीषण आग लागली. बचाव दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या विमानात ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. अपघाताच्या वेळी विमानात ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता,” अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आतापर्यंत 45 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं समोर येत आहे. आता या भीषण विमान अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.विमान कोसळतानाचं थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये जमिनीपासून काही अंतरावर असलेलं हे विमान अचानक कोसळताना दिसतं. या घटनेनंतर विमानाला आग लागली, ही आग विझवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
सध्या याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना बचाव कार्यात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
या विमानातील एकूण प्रवाशांपैकी पाच भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. चार रशियन, एक आयरलँड, कोरियाचे दोन, अर्जेंटिना आणि फ्रांसचा एक-एक नागरिक होता. नेपाळच्या विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ६८ प्रवाशांपैकी सहा लहान मुलांचाही समावेश होता.
येती एअरलाईन्स एअरक्राफ्टचे प्रवक्ते सुदर्शन बार्तोला यांनी सांगितले की, या विमानत ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. काठमांडू वरुन पोखरा येथे हे विमान आले होते. मात्र जुन्या विमातळावर दुर्दैवाने अपघात झाला. याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे विमातळाजवळ असलेल्या डोंगराला धडकून या विमानाचा अपघात झाला असावा. डोंगराला धडक दिल्यानंतर विमान समोर असलेल्या नदी किनारी आदळले. तिथेच या विमानाचा अपघात झाला. अपघातस्थळी बराच वेळ फक्त धुराचे लोळ दिसत होते.

Leave a Reply