मराठी वाङ्मय विश्वाने केलेली विदर्भाची उपेक्षा – परिसंवादाचे आयोजन

नागपूर : १० जानेवारी – गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या विश्व मराठी संमेलनात वैदर्भीयांवर अन्याय झाल्याचे प्रकरण पुढे आले होते, त्यापूर्वी राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कार वितरणातही विदर्भावर अन्याय झाल्याची तक्रार पुढे आली होती. एकूणच मराठी वाङ्मय विश्वाने कायम वैदर्भीयांवर अन्याय केला आहे, अशी भावना पुन्हा एकदा नव्याने वाढीस लागते आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ शाखा आणि नागपूर जिल्हा शाखा तसेच राष्ट्रीय वाचनालाय महाल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वाङ्मय विश्वाने केलेली विदर्भाची उपेक्षा या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राष्ट्रीय वाचनालय महाल सभागृह महाल नर्सिंग टॉकीजजवळ महाल नागपूर येथे आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ. श्री. मा. पांडे हे राहणार असून ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे , साहित्यिक आणि समीक्षक डॉ. ईश्वर नंदपुर,, कामगार चळवळींचे अभ्यासक डॉ. गो. नि. हडप आणि डॉ. छाया नाईक हे आपले विचार व्यक्त करणार आहेत.
या परिसंवादात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असा आवाहान अ. भा. साहित्य परिषदेच्या विदर्भ शाखेचेकार्यध्यक्ष अविनाश पाठक, महामंत्री ऍड. सचिन नारळे नागपूर जिल्हा अध्यक्ष मनीषा अतुल राष्ट्रीय वाचनालयाचे अध्यक्ष पदमश्री तांबेकर, आणि सचिव चंद्रशेखर तिवारी यांनी केले आहे.

Leave a Reply